दिसपूर : आसाममधील (Assam) धुबरी जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदी (Brahmaputra River) पात्रात जवळपास ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली (Boat Capsized) आहे. यावेळी अनेकजण बुडाल्याची भीती व्यक्त होत असून सहा ते सातजण अद्याप बेपत्ता (Missing) आहेत. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती धुबरीचे उपायुक्त एम. पी. अनबामुथन यांनी दिली.
बोट दुर्घटनेत धुबरी विभागीय (Dhubari Division) अधिकारी संजू दासही (Sanju Das) बेपत्ता आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने नदीत बचावकार्य सुरू केले आहे.
Assam | A country-made boat capsized in the Brahmaputra river in Dhubri district. Search and rescue teams have started the operations. More details awaited: Gyanendra Dev Tripathi, Chief Executive Officer, Assam State Disaster Management Authority
— ANI (@ANI) September 29, 2022
ज्यांना पोहता येत होते त्यांचा जीव वाचण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या पथकांना शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.