Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई

Abhishek Banerjee Office : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खासदार पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2026 | 04:36 PM
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई

Follow Us
Follow Us:
  • तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर
  • मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई
  • अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर नोटीस
Abhishek Banerjee Office News In Marathi : पश्चिम बंगालमध्ये बुलडोझर कारवाई सुरू झाली असून ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने हे कार्यालय ‘बेकायदेशीरपणे बांधलेले’ असल्याचे म्हटले आहे. त्यांचे कार्यालय आमताला-बारुईपूर रस्त्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने या प्रकरणी नोटीस बजावली होती, परंतु अभिषेक बॅनर्जी यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर शनिवारी पाडकामाला सुरुवात झाली. प्रशासनाने इमारत पाडली. सकाळी प्रशासन बुलडोझर घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि पाच मजली इमारतीचा बेकायदेशीरपणे बांधलेला भाग पाडला.

Sonam Wangchuk यांना जबरदस्ती उचललं? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; पोलिसांच्या कारवाईवर तातडीच्या…

अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर नोटीस

अभिषेक बॅनर्जी यांचे कार्यालय दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात आहे. जिथे प्रशासनाने यापूर्वी इमारत परवानगीशिवाय बांधण्यात आल्याची नोटीस लावली होती. डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईपूर्वी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कार्यालय विधानसभा निवडणुकांपासून बंद होते, परंतु कार्यालयाची वैध कागदपत्रे सादर केली गेली नाहीत. अभिषेक बॅनर्जी यांचे हे कार्यालय टीएमसीचे एक महत्त्वाचे कार्यालय होते, जिथे अनेकदा मोठ्या सभा होत असत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते ओसाड पडले आहे.

VIDEO | West Bengal: A demolition drive is underway at TMC MP Abhishek Banerjee’s alleged illegal five-storey party office in Amtala area of South 24 Parganas district. (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/dXae2EV4Na — Press Trust of India (@PTI_News) July 18, 2026

कडक सुरक्षा

शनिवार सकाळपासून पक्षाच्या कार्यालयाच्या परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. परिसराभोवती बॅरिकेड्स उभारण्यात आले होते आणि वरिष्ठ पोलीस व नागरी प्रशासनाचे अधिकारी या कारवाईवर लक्ष ठेवून होते. अधिकाऱ्याने सांगितले, “ही कारवाई शांततेत आणि कायद्यानुसार पार पडावी, यासाठी आम्ही सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. पाडकाम कायदेशीर प्रक्रियेनुसारच केले जात आहे.” जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या नोटीसनुसार, ज्या जमिनीवर पक्षाचे कार्यालय आहे, ती जमीन ‘लीप्स अँड बाउंड्स’ नावाच्या कंपनीच्या नावाने खरेदी करण्यात आली होती. या नोटीसमध्ये जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि बांधकामाच्या नोंदींबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

Sonam Wangchuk यांच्या प्रकृतीबाबत पत्नीचा गंभीर आरोप; सफदरजंग रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल देण्यास नकार

Web Title: A bulldozer action on abhishek banerjee office heavy police force west bengal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • West bengal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.