
Football चाहत्यांनो 'चलो कोलकाता'; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी
जगातील दोन आघाडीच्या फुटबॉल क्लबच्या माजी खेळाडूंना एकाच मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याने कोलकात्यातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दोन्ही क्लबचे या शहरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्यात लुईस फिगो, स्पेनचा माजी गोलरक्षक इकर कॅसिलास आणि बार्सिलोनाचा दिग्गज खेळाडू कार्लेस पुयोल यांचा सहभाग अपेक्षित आहे. मात्र, सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची नावे आणि सामन्याशी संबंधित अन्य तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
अलीकडेच ब्राझील आणि उरुग्वे यांच्याविरुद्ध भारतीय फुटबॉल संघाचे सामने पाहिलेल्या कोलकात्यातील चाहत्यांसाठी हा सामना विशेष ठरणार आहे. रिअल माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील ऐतिहासिक प्रतिस्पर्धेच्या आठवणींना या लढतीतून उजाळा मिळणार आहे.
माही पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 साठी धोनीच्या पुनरागमनाची चाहत्यांना आशा
६ एप्रिल २०२५ रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रिअल माद्रिद आणि बार्सिलोना यांच्या माजी खेळाडूंचा सामना झाला होता. त्या लढतीत रिअल माद्रिदच्या लिजेंड्स संघाने 2-0 असा विजय मिळवला. फर्नांडो मोरिएंटेस आणि डेव्हिड बॅरेल यांनी गोल केले होते.
या सामन्यात रिअल माद्रिदकडून लुईस फिगो, मायकेल ओवेन आणि पेपे यांसारखे नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. बार्सिलोनाच्या संघात झावी हर्नांडेझ, रिवाल्डो आणि कार्लेस पुयोल यांचा समावेश होता.
ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी
25 नोव्हेंबरला होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांची विक्री, सामना सुरू होण्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण याबाबतची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. या तपशीलांची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना सामन्याचे नियोजन करता येणार आहे.