Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेड-प्लस सुरक्षेत मोठा भंग! ममतांच्या दिशेने चाकू घेऊन धावता प्रयत्न ‘पिशी’ म्हणत जवळ आली अन्…

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कालीघाटमध्ये चाकूने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे. दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना महिलेने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 10:45 AM
झेड-प्लस सुरक्षेत मोठा भंग! ममतांच्या दिशेने चाकू घेऊन धावता प्रयत्न ‘पिशी’ म्हणत जवळ आली अन्...

झेड-प्लस सुरक्षेत मोठा भंग! ममतांच्या दिशेने चाकू घेऊन धावता प्रयत्न ‘पिशी’ म्हणत जवळ आली अन्...

Follow Us
Follow Us:
  • ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
  • महिलेच्या हातात चाकू असल्याचा टीएमसीचा दावा
  • कालीघाटमध्ये सुरक्षाभंग; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठा भंग झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कालीघाट परिसरात घडली. दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना एका महिलेने ममता बॅनर्जी यांच्याजवळ आक्रमकपणे जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. या महिलेच्या हातात चाकू असल्याचा दावाही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या घटनेत ममता बॅनर्जी यांना कोणतीही इजा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ममता बॅनर्जी त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाजवळून मिलन संघाच्या दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात होत्या. त्यावेळी एक महिला अचानक त्यांच्या सुरक्षा कडेपाशी आली. तिने ममता बॅनर्जी यांना ‘पिशी’ म्हणजेच आत्या म्हणून संबोधले आणि त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, असा दावा तृणमूलच्या तक्रारीत करण्यात आला आहे.

महिलेच्या हातात चाकू असल्याचा दावा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी कालीघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, संबंधित महिला कथितरित्या नशेच्या अवस्थेत होती आणि तिने शिवीगाळ करत ममता बॅनर्जी यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे चाकू असल्याचे नंतर लक्षात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तृणमूल कार्यकर्त्यांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी अद्याप महिलेच्या हातात चाकू असल्याच्या दाव्याची पुष्टी केलेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी घराबाहेर पडत असताना संबंधित महिलेने त्यांना गाठले आणि दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

हेही वाचा: Accident News: ‘हेल्प… हेल्प…’च्या आर्त हाका! इम्पेरियल हाइट्सच्या आगीत दोन महिलांचा मृत्यू

झेड प्लस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

ममता बॅनर्जी यांना झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही एक महिला त्यांच्या सुरक्षा कडेपाशी पोहोचल्याने सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी हा प्रकार मोठ्या कटाचा भाग आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी सुरू असून तिच्या वर्तनामागील नेमके कारण काय होते, ती ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि तिच्याकडे खरोखर चाकू होता का, याचा तपास केला जात आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही पोलिसांकडे देण्यात आले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच हल्ल्याच्या प्रयत्नाबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Mamata banerjee knife attack attempt kalighat security breach sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Attack
  • Knife attack
  • Mamata Banerjee
  • west bengal News
  • West Bengal Politics

संबंधित बातम्या

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु
1

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट
2

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्…
3

छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्…

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान
4

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.