Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझ्या हत्येचा कट रचला जातोय…”, Mamata Banerjee यांचा भाजपवर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवरही कडाडले

पुरुलिया जिल्ह्यातील मानबाजार येथील जनसभेत भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्लाबोल केला. "भाजप नेते माझ्या हत्येचा कट रचत आहेत," असा खळबळजनक दावा करत त्यांनी बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 05:48 PM
"माझ्या हत्येचा कट रचला जातोय...", Mamata Banerjee यांचा भाजपवर खळबळजनक आरोप (Photo Credit- X)

"माझ्या हत्येचा कट रचला जातोय...", Mamata Banerjee यांचा भाजपवर खळबळजनक आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “माझ्या हत्येचा कट रचला जातोय…”
  • Mamata Banerjee यांचा भाजपवर खळबळजनक आरोप
  • निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवरही कडाडले
Mamata Banerjee on BJP: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पुरुलिया जिल्ह्यातील मानबाजार येथील जनसभेत भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्लाबोल केला. “भाजप नेते माझ्या हत्येचा कट रचत आहेत,” असा खळबळजनक दावा करत त्यांनी बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपल्या प्रकृतीवरून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी भाजप नेत्यांच्या विधानांमधून साशंकता व्यक्त केली.

“मी मरणाच्या दारातून परत आलेय!”

ममता बॅनर्जी यांनी भाषणादरम्यान त्यांच्या जुन्या जखमा आणि प्रकृतीवरून भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खरपूस समाचार घेतला. “मी मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा उभी राहिली आहे. माझ्या जखमेबद्दल कोणाला शंका असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा अहवाल तपासावा. निवडणुकीच्या काळात मला जाणूनबुजून जखमी करण्याचा कट आखण्यात आला होता. तरीही मी व्हीलचेयरवर बसून प्रचार केला,” असे त्या म्हणाल्या. भाजपच्या विधानांमधून दंग्यांसारखा एखादा नवा कट रचला जात असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मतदार यादीतून 1.2 कोटी नावे गायब; सर्वोच्च न्यायालयात जाणार

निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी SIR (Special Intensive Revision) च्या मुद्द्यावरून केंद्रावर निशाणा साधला. राज्यातील सुमारे १ कोटी २० लाख लोकांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “या लोकांच्या हक्कासाठी मी रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देईन. गरज पडल्यास पीडितांना मोफत कायदेशीर मदतही दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भाजपचे चाणक्य उतरणार मैदानात; ममता बॅनर्जींविरोधात दाखल करणार खळबळजनक चार्जशीट

अमित शाह आणि गुजरात दंग्यांचा उल्लेख

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जे लोक दंगलींच्या माध्यमातून सत्तेवर आले, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये.” त्यांनी यावेळी गुजरात दंगलींचा संदर्भ देत भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, महागाई आणि निवडणुकीच्या काळात भाजपकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांवरूनही त्यांनी जोरदार प्रहार केला.

विरोधकांच्या अज्ञानावर टीका

डाव्या पक्षांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या लोकसंख्येची रचना  बदलल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. “विपक्ष इतिहास आणि समाजाबद्दल अज्ञान पसरवत असून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

Elections 2026 : तामिळनाडू-बंगालमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान; डाव्या पक्षांना देऊ शकणार का मात?

Web Title: A conspiracy to assassinate me is being hatched mamata banerjee levels a sensational allegation against the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Assembly Elections
  • BJP
  • Mamata Banerjee

संबंधित बातम्या

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद
1

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न
2

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
3

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
4

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.