Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Twisha Sharma Case: ‘मृत मुलीपेक्षा घटस्फोटीत मुलगी केव्हाही बरी’; ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात तुषार मेहतांची महत्त्वपूर्ण टिप्पण

Twisha Sharma Case: सरकारी वकील मेहता यांनी , गिरीबाला सिंग यांचा जबाब नोंदवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्या जबाब देण्यास तयार नव्हत्या. त्यांच्या सासूने तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा केला

  • By anuradha sagar
Updated On: May 25, 2026 | 02:33 PM
Twisha Sharma, Supreme Court, Tushar Mehta, Bhopal News,

Twisha Sharma, Supreme Court, Tushar Mehta, Bhopal News,

Follow Us
Follow Us:
  • ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
  • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता-सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
  • गिरीबाला सिंह या टीव्ही चॅनलवर मुलाखती देऊन आपल्या सुनेची बदनामी करण्याचा प्रयत्न-सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
Twisha Sharma Case: मध्यप्रदेशातील ३३ वर्षीय कॉर्पोरेट व्यावसायिक आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा हिचा १२ मे रोजी मृत्यू झाला. भोपाळच्या कटारा हिल्स परिसरातील तिच्या सासरच्या घरी ट्विशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. यानंतर, ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींवर अनेक आरोप करत तिच्या मृत्यूसाठी सासरचे जबाबदार असल्याचा दावा केला. सर्वोच्च न्यायालयाने ट्विशा शर्मा यांच्याशी संबंधित या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून स्वतःहून (suo motu) दखल घेतली आहे.

या प्रकरणाची आज (25 मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “मृत मुलीपेक्षा घटस्फोटीत मुलगी केव्हाही बरी.” तसेच, ट्विशाने सासरच्या मंडळींबाबत केलेल्या तक्रारींबाबत जर कुटुंबियांनी वेळीच कारवाई करायला हवी होती. असं म्हणत नाराजीही व्यक्त केली.

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर सायबर धोक्याची घंटा! 18 विमानांच्या उड्डाणांवर परिणाम, एअरपोर्टवर GPS Spoofing चा फटका

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे मध्य प्रदेश सरकारच्या वतीने सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली, तर ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी आरोपी कुटुंबाचे प्रतिनिधित्व केले.

‘लाइव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, ट्विशाच्या सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांनी टिव्ही चॅनेल्सवर काही दावे करत ट्विशावर आरोप केले होते. त्यावर, गिरीबाला सिंह या टीव्ही चॅनलवर मुलाखती देऊन आपल्या सुनेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तपासात सहकार्य करत नाहीयेत,” असेही सांगितले. त्यावर
जेव्हा सिद्धार्थ दवे यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम १६४ अंतर्गत नोंदवलेला संपूर्ण जबाब आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे, तेव्हा सॉलिसिटर जनरल (SG) तुषार मेहता म्हणाले, “आणि ट्विशाची सासू गिरीबाला सिंह, विविध वाहिन्यांवर मुलाखती देत ​​आहेत आणि आपल्या सुनेची बदनामी करणारी विधाने करत आहेत.”

MLC Election 2026: विधान परिषदेसाठी काय आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सर्वाधिक जागांसाठी भाजपकडून रस्सीखेच ?

सिद्धार्थ दवे यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, आम्ही कोणतेही नॅरेटिव्ह रचण्याच्या विरोधात आहेत, म्हणूनच या तपासाची जबाबदारी सीबीआय’कडे सोपवण्यात आली आहे. आमचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण प्रसारमाध्यमांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत, कोणत्याही पक्षाच्या विधानांवर आधारित दावे करू नयेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित दोन्ही पक्षकारांच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलू नये, असे आवाहनही सुर्यकांत यांनी केलं आहे.

दरम्यान, सरकारी वकील मेहता यांनी , गिरीबाला सिंग यांचा जबाब नोंदवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्या जबाब देण्यास तयार नव्हत्या. त्यांच्या सासूने तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा केला. त्यावर गिरीबाला यांच्या वकिलांनी आक्षेप घेत, ” मेहता यांचा दावा चुकीचा असून अशा गोष्टींवर येथे चर्चा करू नये. गिरीबाला यांनी त्यांचा जबाब नोंदवला असल्याचे सांगितले.

पीडितेच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायालयाला सांगितले की, घटनेच्या तीन दिवसांनंतर FIR दाखल करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर पुरावे सुरक्षित ठेवण्यातही हलगर्जीपणा करण्यात आला. गिरीबाला सिंग स्वतःचे कॉल डेटा रेकॉर्ड सादर करत आहेत, ज्याला परवानगी नाही. सरकारी वकील तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, दिल्ली एम्सच्या पथकाने रविवारी ट्विशाचे दुसरे शवविच्छेदन केले.

Web Title: A divorced daughter is better than a dead one sg tushar mehta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • crime news
  • Supreme Court

संबंधित बातम्या

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
3

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.