Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Srinagar News: आई ती आईच….! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडीत मायेची घोंगडी

२२ ऑक्टोबर २०१६ रोजी साबा सेक्टरमधील बोबिया या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना बीएसएफचे २४ वर्षीय शिपाई गुरनामसिंग मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झाले.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 11, 2026 | 11:10 AM
A Mother’s Eternal Love: Martyr Gurnam Singh’s Statue Covered with a Blanket in Winter

A Mother’s Eternal Love: Martyr Gurnam Singh’s Statue Covered with a Blanket in Winter

Follow Us
Follow Us:
  • २२ ऑक्टोबर २०१६ रोजी गुरनामसिंग शहीद झाले
  • श्रीनगरमध्ये थंडी पडली असताना मुलाला थंडी वाजू नये म्हणून आईने गुरनामसिंग यांच्या पुतळ्याला घोंगडी पांघरली
  • गुरनामला लहानपणापासूनच खूप थंडी वाजत असे आणि त्याला घोंगडी पांघरण्याची खूप आवड होती
The mother covered her martyred son’s statue with a blanket : आई ती आईच असते…. कडाक्याच्या थंडीत ती आपल्या लेकाला थंडी कशी काय लागू देईल? मुलगा उघड्या आभासाखाली असताना ही वृद्ध माता घरात उबदार घोंगडे ओढून कशी काय झोपू शकेल? ती घरातून बाहेर पडली आणि आरएसपुरा येथील रठाना मोड (गुरनामसिंग चौक) येथे आपल्या शहीद मुलाच्या पुतळ्यापाशी पोहोचली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि हातात घोंगडी होती. आईने पुतळ्याला मायेने कुरवाळले आणि त्याला घोंगडी पांघरली. ती म्हणाली, सध्या इतक्या थंडीत सर्व लोक आपल्या घरात हिटर लावून बसले आहेत, अशात माझा मुलगा थंडीत कसा काय उभा राहील? आई आहे मी, मन कसं काय मानेल ? हे दृश्य एक स्मृती नसून, बलिदानी कधीच मरत नाहीत याचा पुरावा आहे.

MI vs DC, WPL live score : मुंबईने उडवला दिल्लीचा धुव्वा! कौर आर्मीने जेमिमाहच्या संघाचा केला 50 धावांनी पराभव 

आवाज आजही कानात घुमतो

मुलाच्या हौतात्म्याचा उल्लेख करताना आईचे डोळे वारंवार पाणावत होते. त्या म्हणाल्या की, मुलाला गमावल्याचे दुःख कधीच कमी होणार नाही, पण त्याने देशासाठी प्राण दिले याचा सार्थ अभिमान आहे. आजही त्याचा आवाज कानात घुमतो.

२०१६ मध्ये हौतात्म्य

२२ ऑक्टोबर २०१६ रोजी साबा सेक्टरमधील बोबिया या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना बीएसएफचे २४ वर्षीय शिपाई गुरनामसिंग मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झाले. गुरनाम यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी या चौकात त्यांचा पुतळा उभारण्यात आला, प्रत्येक आई आपल्या मुलाची करते, तेवढीच गुरनाम यांची आई जसवंत कौर आजही त्यांची काळजी घेतात. शुक्रवारी पुतळ्यापाशी उभ्या असलेल्या जसवंत कौर यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, गुरनामला लहानपणापासूनच खूप थंडी वाजत असे आणि त्याला घोंगडी पांघरण्याची खूप आवड होती. तो ऑक्टोबरमध्येच ब्लॅंकेट  बाहेर काढायला लावायचा. ड्युटीवर असतानाही तो घरून गरम कपडे आणि घोंगडी मागवून घेत असे.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

तुझा वाघ घाबरणार नाही

जसवंत कौर यांनी सांगितले की, शहीद होण्यापूर्वी गुरनामने घरी फोन करून सांगितले होते की, त्याने दहशतवाद्यांना ठार केले. स्वतःची काळजी घेण्यास सांगितले असता तो म्हणायचा, तुझा वाघ घाबरणार नाही. तो अनेकदा म्हणायचा की, ‘मी शहीद झालो तर गावाच्या चौकात माझा पुतळा उभारा, जो संपूर्ण जग बघेल.’

आज आमच्याकडे खाण्यासाठीही काही नाही

वडील कुलबीरसिंग शांत उभे राहून पुतळ्याकडे बघत होते. त्यांच्या शांततेत पित्याचा अभिमान आणि तुटलेल्या हृदयाचे दुःख दोन्ही स्पष्ट दिसत होते. आई जसवंत कौर म्हणाल्या की, ज्या चौकात पुतळा आहे तो खूप छोटा आहे. अनेकदा तिथून गाड्या जाताना स्मारकाला धक्का लागतो, तेव्हा माझे काळीज फाटते. हा चौक मोठा केला पाहिजे. वडील कुलबीर यांनी आपले दुःख मोकळे करताना सांगितले की, गुरनाम शहीद झाला तेव्हा आम्हाला अनेक आश्वासने देण्यात आली. माझ्या मुलीला बीएसएफने नोकरी दिली, आता तिचे लग्न झाले आहे. पण जम्मू-कश्मीर सरकारने काहीच दिले नाही. पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आजही अपूर्ण आहे. आमच्याकडे शेतीवाडी नाही आणि खाण्यासाठीही काही नाही.

Web Title: A mothers eternal love martyr gurnam singhs statue covered with a blanket in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • bsf jawan
  • indian army
  • Srinagar

संबंधित बातम्या

Major Navya Shekhawat: कोण आहेत मेजर नव्या शेखावत? राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी ADC
1

Major Navya Shekhawat: कोण आहेत मेजर नव्या शेखावत? राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी ADC

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?
2

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?

Indian Army: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न आहे का? जाणून घ्या मेजर आणि ब्रिगेडियरमध्ये नेमका काय फरक आहे?
3

Indian Army: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न आहे का? जाणून घ्या मेजर आणि ब्रिगेडियरमध्ये नेमका काय फरक आहे?

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
4

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.