Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal On Delhi Election: “आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो…”; पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 08, 2025 | 03:23 PM
Arvind Kejriwal On Delhi Election: "आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो..."; पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

Arvind Kejriwal On Delhi Election: "आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो..."; पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:

Delhi Assembly Election Result 2025 :दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 70 जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. दरम्यान दिल्ली विधानसभेत पक्षाला आलेले अपयश आणि स्वतःचा झालेला पराभव यावर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले, “आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीच्या जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो. मी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेने ज्या अपेक्षेने भाजपला विजयी केले आहे, ते त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो.”

pic.twitter.com/X2CKGVpE9G — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 8, 2025

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “गेली 10 वर्षे जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही खूप कामे केली. आरोग्य , वीज, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात जनतेला चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न केला. जनतेने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार आम्ही मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडू. लोकांच्या आनंदात, दुखा:त आम्ही सहभागी होऊ. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलेलो नव्हतो. तर आम्ही लोकांच्या सेवेसाठी राजकारण हे एक साधन समजत आलो आहोत.

27 वर्षांनी दिल्लीत ‘कमळ’ फुलवलं; PM मोदी साजरा करणार विजयोत्सव

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.  दरम्यान भाजपच्या या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार आहेत. संध्याकाळी ते भाजपच्या कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत. दिल्लीत भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

हेही वाचा: PM Narendra Modi: भाजपनं करून दाखवलं; 27 वर्षांनी दिल्लीत ‘कमळ’ फुलवलं; PM मोदी साजरा करणार विजयोत्सव

तब्बल 27 वर्षांनी दिल्ली विधानसभेत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झालेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र भाजप ऐनवेळी नवीन वेगळी खेळी खेळून दुसऱ्या चेहऱ्याला संधी देणार का हे पहावे लागेल. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ते भाजपच्या कार्यकर्त्याना संबोधित करू शकतात.

अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. यावेळी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांपैकी ‘नवी दिल्ली’ जागा सर्वात जास्त चर्चेत आहे. नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

हेही वाचा: Delhi Assembly Election Result: दिल्लीच्या निकालावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले , “१० वर्षे असलेलं ‘आप’चे…”

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे ‘आप’ मोठ्या पराभवाकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. तर काँग्रेसचे संदीप दीक्षित तिसऱ्या स्थानावर राहिले.

 

Web Title: Aam adami party chief and former cm arvind kejriwal first reaction about aap loss at delhi assembly election result 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • BJP
  • Delhi Assembly Election

संबंधित बातम्या

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ
2

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
3

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

E-20 वरून अरविंद केजरीवाल आक्रमक; तब्बल 29 वाहन कंपन्यांना दिले पत्र अन्…
4

E-20 वरून अरविंद केजरीवाल आक्रमक; तब्बल 29 वाहन कंपन्यांना दिले पत्र अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.