दिल्लीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता (फोटो- फेसबुक)
Delhi Assembly Election Result 2025 :दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 70 जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. दरम्यान भाजपच्या या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार आहेत. संध्याकाळी ते भाजपच्या कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत. दिल्लीत भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.
तब्बल 27 वर्षांनी दिल्ली विधानसभेत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झालेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र भाजप ऐनवेळी नवीन वेगळी खेळी खेळून दुसऱ्या चेहऱ्याला संधी देणार का हे पहावे लागेल. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ते भाजपच्या कार्यकर्त्याना संबोधित करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रत्येक विजयानंतर दिल्लीत पक्ष मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित करतात. ही परंपरा कायम राहणार असल्याचे आज पाहायला मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज भाजपच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर आतिशी यांनी भाजपचे रमेश विधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांचा पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाशी झालेल्या चुरशीच्या लढतीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. आप आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली, त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव करून निवडणूक जिंकली. या जागेवर काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती.
हेही वाचा : Atishi Marlena: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय, तर भाजपचे रमेश बिधुरी पराभूत
अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. यावेळी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांपैकी ‘नवी दिल्ली’ जागा सर्वात जास्त चर्चेत आहे. नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे ‘आप’ मोठ्या पराभवाकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. तर काँग्रेसचे संदीप दीक्षित तिसऱ्या स्थानावर राहिले.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है | महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे.