Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke : सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन पेटले; अभिजीत दिपकेंवर शाईफेक, उपोषणाची घोषणा

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीनं रुग्णालयात नेल्याच्या निषेधार्थ अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2026 | 02:16 PM
सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन पेटले; अभिजीत दिपकेंवर शाईफेक, उपोषणाची घोषणा

सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन पेटले; अभिजीत दिपकेंवर शाईफेक, उपोषणाची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन पेटले
  • अभिजीत दिपकेंवर शाईफेक
  • उपोषणाची घोषणा
Abhijeet Dipke News Marathi : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. याचदरम्यान एका महिलेने त्यांच्यावर शाईफेक केल्याने आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला तात्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या दिल्ली पोलीस तिची चौकशी करत आहेत.

शाईफेक झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना, “निळा हा माझा आवडता रंग आहे,” अशी पोस्ट केली. त्यांच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.

#WATCH | Delhi: Moment when ink was thrown at the founding president of the Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, during the protest at Jantar Mantar pic.twitter.com/okqNkjXNC7 — ANI (@ANI) July 18, 2026

‘सोनम वांगचुक यांना गुन्हेगारासारखे उचलले’

अभिजीत दिपके यांनी आंदोलकांना संबोधित करताना सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने आंदोलनस्थळावरून हटवले, त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “त्यांना गुन्हेगारांप्रमाणे उचलून नेण्यात आले. आंदोलन कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आता मी त्यांच्या जागी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर आरोप करताना म्हटले की, दिल्ली उच्च न्यायालयाने केवळ प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र, सोनम वांगचुक यांनी स्वतःची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले होते आणि वैद्यकीय अहवालातही त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे दिसत होते.

Modi Must Resign: आता धर्मेद्र प्रधानांचा नाही थेट नरेंद्र मोदींचा राजीनामा..! जंतर-मंतरवरील राड्यानंतर अभिजीतचा आक्रमक पवित्रा

गीतांजली अंग्मो यांचा पोलिसांवर सवाल

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाने रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले नव्हते, तर केवळ नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सोनम वांगचुक यांच्यावर कोणतेही उपचार सुरू नाहीत. केवळ तपासण्या सुरू असून, सरकारी रुग्णालयाने दिलेल्या काही वैद्यकीय अहवालांबाबत शंका असल्याने स्वतंत्र प्रयोगशाळेतून पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सोनम वांगचुक अजूनही उपोषणावर’

गीतांजली अंग्मो यांनी सांगितले की, सोनम वांगचुक अजूनही उपोषणावर असून ते फक्त मीठ मिसळलेले पाणी घेत आहेत. सरकारने त्यांना रुग्णालयात आणले याबद्दल आभार असले तरी पुढील वैद्यकीय निर्णय कुटुंब स्वतः घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी वांगचुक यांची प्रकृती अशक्त असली तरी स्थिर असल्याचेही सांगितले.

डॉक्टरांची माहिती

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारे डॉ. सतीश लाम्बा यांनी सांगितले की, त्यांना वांगचुक यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तथापि, शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होण्याचा (हायपोकॅलेमिया) धोका लक्षात घेऊन त्यांच्यावर सतत वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांची गुप्त रणनीती?

दरम्यान, सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीने नियोजन केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही देण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे, दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या कथित गुप्त नियोजनाबाबत अधिकृतपणे पोलिसांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

CJP Protest: सोनम वांगचुक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांची अनिश्चितकालीन उपोषणाची घोषणा!

Web Title: Abhijit dipke ink attack jantar mantar hunger strike protest sonam wangchuk news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • NEET
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू
2

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा
3

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

Kangana Ranaut Abhijeet English: १२वी पास कंगना की अमेरिकेतून परतलेला अभिजीत दिपके? कोणाची इंग्रजी भारी? अभिनेत्रीने दिला पुरावा
4

Kangana Ranaut Abhijeet English: १२वी पास कंगना की अमेरिकेतून परतलेला अभिजीत दिपके? कोणाची इंग्रजी भारी? अभिनेत्रीने दिला पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.