
CJP, Abhijeet Dipke, Sourav Das, Ashutosh Ranka,
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेविरोधात ही रॅली काढण्यात येणार आहे. जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्याचा आरोपात सौरव आणि आशुतोष यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. याविरोधात ही रॅली काढली जाणार आहे. अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, ” कॉकरोच जनता पक्षाचा स्थापनेपासूनच आम्ही नेहमीच गांधीजींच्या शांतता आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण करू आणि आम्ही हे वचन पाळले आहे. आम्ही मुंबई, पुणे, जयपूर, लखनौ, बंगळूर आणि नागपूर येथे आंदोलने केली आहेत आणि ती सर्व पूर्णपणे शांततापूर्ण होती.
Supreme Court on CJP Protest: CJPच्या आंदोलनाच्या स्थगितीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पण त्यानंतरही “जयपूरमध्ये माझ्यावरही हल्ला झाला होता, पण मी प्रत्युत्तर दिले नाही, कारण हिंसेला हिंसेने उत्तर देणे हे आमच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. शारीरिक बळाचा वापर करण्याऐवजी, आम्ही डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानाने आम्हाला दिलेल्या हक्कांचा वापर करण्यास प्राधान्य देतो. आमची ताकद घटनात्मक मूल्यांप्रति असलेल्या आमच्या वचनबद्धतेतून येते आणि कोणतेही चिथावणीखोर कृत्य आम्हाला ही मूल्ये सोडायला भाग पाडू शकत नाही.” असही अभिजीत यांनी म्हटलं आहे.
अभिजीत दिपके म्हणाले की, “असे असूनही, आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून आम्हाला अराजकतावादी ठरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सरकारकडून उत्तरे मागणे ही अराजकता नाही. रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे अराजकता नाही आणि सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारणे तर निश्चितच अराजकता नाही. ही लोकशाहीची सर्वात मूलभूत रूपे आहेत.”
सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करताना अभिजीत दीपके म्हणाले, “आज सत्तेत असलेला पक्ष, विरोधी पक्षात असताना, अनेक दशके रस्त्यावर उतरून आंदोलने करत होता आणि तत्कालीन सरकारांना प्रश्न विचारत होता. जर त्या वेळी त्यांच्यावर असेच निर्बंध, दहशत किंवा पोलिसांकडून होणारी क्रूरता लादली गेली असती, तर आज सत्तेत असलेले अनेक जण कदाचित त्यांच्या पदांपर्यंत पोहोचलेच नसते. विरोधी पक्षात असताना आंदोलनांना ‘लोकशाही हक्क’ म्हणून पाठिंबा देणे आणि मग सत्तेत आल्यावर त्याच कृतींना ‘कायदा आणि सुव्यवस्थेला धोका’ म्हणायला सुरुवात करणे, हा निव्वळ ढोंगीपणा आहे.”
अभिजीत दीपक म्हणाले, “आम्ही कोणतेही विशेष हक्क किंवा विशेष वागणूक मागत नाही. सत्तेत कोणताही पक्ष असला तरी, या प्रजासत्ताकातील प्रत्येक नागरिकाला उपलब्ध असलेले हक्क आम्हाला फक्त वापरायचे आहेत. त्यामुळे, या देशाचे नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडूया, आपल्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारूया, उत्तरदायित्वाची मागणी करूया आणि जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे आवाज उठवूया. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे हे कर्तव्य आहे की त्यांनी लोकांचे ऐकावे.” लोकांना गप्प करू नका. मतमोजणी झाल्यावर लोकशाही संपत नाही.