चीनने जगभरातील देशांच टेन्शन वाढवलं आहे. भारतातही कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आता चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी दिली. या प्रवाशामध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास या लोकांना क्वारंटाईन करण्यात येईल.
[read_also content=”देशात कोरोनाचा धोका वाढतोय? गेल्या 24 तासात 201 नवीन रुग्णांची नोंद, देशातील 75% लोक बूस्टर डोसविना! https://www.navarashtra.com/india/201-new-cases-reported-in-last-24-hours-75-of-country-without-booster-dose-356318.html”]
गेल्या 24 तासांत देशात 201 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या भारतात 3,397 सक्रिय रुग्ण आहेत, जी एकूण रुग्णसंख्यापैकी 0.01% आहे. तर कोरोन रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे. गेल्या 24 तासांत 183 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,42,791 झाली आहे.