Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election 2025: महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली..; केजरीवालांचा भाजपवर आरोप

20 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 29 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 106,873 आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 29, 2024 | 03:03 PM
Delhi Election 2025: महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली..; केजरीवालांचा  भाजपवर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील विरोधी महाविकास आघाडीकडून मतदार यादीतील नावे गायब झाल्याचा दावा करण्यात  आला होता.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपकडून मतदार यादीतील मतदारांची नावे वगळ्याचा आरोप केला होता. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या  होत्या. त्यानंतर आता येत्या काही दिवसांत दिल्ली विधानसभा निवडणुका होणार आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षानेही या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. असे असतानाच आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर तेच आरोप केले आहेत, जे महाराष्ट्रात नाना पटोले यांनी केले होते.

आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी भाजपवर दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला. राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दावा केला की,  ‘भारतीय जनता पक्ष (भाजप) मजबूत उमेदवार किंवा मुद्दे सादर करण्यात अयशस्वी झाल्यानंतर  आता  अयोग्य मार्गाने” निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप आधीच निवडणुका हरले आहे. त्यात मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा किंवा योग्य उमेदवारही नाही. हेराफेरी करून निवडणूक जिंकणे हेच त्यांचे ध्येय आहे.

Delhi Assembly Election : दिल्लीच्या प्रचारसभेत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार; जागांबाबत केली मोठी भविष्यवाणी

भाजपने एकट्या मतदारसंघातील 11,000 मतदारांची नावे हटवण्यासाठी अर्ज दाखल केले होते, परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर हे  थांबवण्यात आले. आम्ही ते उघड केल्यामुळे निवडणूक आयोगाने ही नावे हटवण्यास नकार दिला. 15 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू झाली, ज्या अंतर्गत त्यांच्या विधानसभा मतदारसंघ नवी दिल्लीमध्ये आतापर्यंत 5,000 मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज आणि 7,500 मतदारांची नावे जोडण्यासाठी विनंत्या दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे मतदारसंघातील 12 टक्के मतांमध्ये बदल होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

ऑपरेशन लोटस

20 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 29 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 106,873 आहे. ‘ऑपरेशन लोटस’ आता माझ्या मतदारसंघात पोहोचले आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. “ते निवडणूक निकाल बदलण्यासाठी मतदार यादीत फेरफार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच, अशा हेराफेरीमुळे लोकशाही कमकुवत होते. “आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो की अशा प्रकारच्या अनियमितता रोखण्यासाठी त्यांचे कठोर निरीक्षण चालू ठेवावे.” या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Nigambodh Ghat: मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या निगमबोध घाटाचा काय आहे इतिहास?

Web Title: After maharashtra names of voters were also excluded from the voter list in delhi kejriwal accuses bjp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • aam adami party
  • arvind kejariwal
  • BJP
  • crime news
  • Delhi Assembly election 2025

संबंधित बातम्या

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
1

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
2

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
4

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.