Aman Sehrawat Won Gold Medal
२०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अमनला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु, यावेळी त्याने त्याची कसर भरून काढली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.अमनने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि कोरियन खेळाडूवर दबाव आणला. पहिल्या फेरीत, प्रतिस्पर्धी ‘हान’ने त्याच्यावर सातत्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण अमनने शानदार कौशल्य दाखवत स्वतःचा डिफेन्स केला आणि ६-१ अशी भक्कम आघाडी घेतली.
मात्र, जेव्हा दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच एका मिनिटात हानने जोरदार पुनरागमन केले. हानच्या अचानक आणि भेदक अटॅकमुळे अमनवर काहीसा दबाव आला. अमनने सलग सहा गुण मिळवून ६-१ ची आघाडी गमावली आणि तो ६-७ ने मागे पडला. या क्षणी, सामना भारताच्या हातून निसटत असल्याचे दिसत होते.परंतु, अमनने हार मानली नाही. दबावाखाली असूनही, त्याने शांतपणे एक शानदार खेळी करत सलग चार गुण मिळवले. यानंतर, चोंग सॉन्गहानने टेकडाउनचा प्रयत्न केला. पण, अमनने प्रतिहल्ला करून दोन गुण मिळवले. परंतु कोरियन संघाने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले, जे पडताळणीनंतर फेटाळण्यात आले. नियमांनुसार, हे आव्हान अयशस्वी ठरले, ज्यामुळे अमनला एक अतिरिक्त गुण मिळाला. अशाप्रकारे, अमनने आपली आघाडी अधिक मजबूत केली अखेरीस, अमनने कोरियन खेळाडूला ११-७ ने हरवून सुवर्णपदक जिंकले. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत २० सुवर्णपदके जिंकली आहेत.
शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सुजीत कालकलने ताजिकिस्तानच्या अब्दुलमझिद कुदिएवला १०-९ ने हरवून पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकले. सुरुवातीला २-९ ने मागे असल्याने, सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. त्याने शेवटच्या दोन मिनिटांत जोरदार कमबॅक करत सामन्याचे चित्रच पालटले. त्याने सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये अब्दुलमझिद कुदिएवला प्रतिहल्ला करण्याची कोणतीही संधी दिली नाही. सुजीतने सलग चार वेळा प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून सुवर्णपदक मिळवले. सुजीतने उपांत्य फेरीचा सामनाही एकतर्फी जिंकला होता.






