पगार मागितला म्हणून कर्मचाऱ्याला मारहाण, तोंडात जोडेही घातले; गुजरातच्या मोरबीतील घटना

गुजरातच्या मोरबीमधून एक किळसवाणी घटना समोर आली आहे. मोरबीमध्ये कामाचा पगार मागणाऱ्या एका व्यक्तीला तोंडात जोडे घालून माफी मागण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला व्यावसायिकाने तिच्या कर्मचाऱ्यासोबत हा क्रूर प्रकार केला आहे.

    नवी दिल्ली : गुजरातच्या मोरबीमधून एक किळसवाणी घटना समोर आली आहे. मोरबीमध्ये कामाचा पगार मागणाऱ्या एका व्यक्तीला तोंडात जोडे घालून माफी मागण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला व्यावसायिकाने तिच्या कर्मचाऱ्यासोबत हा क्रूर प्रकार केला आहे.

    पगार मागण्यासाठी कर्मचारी महिलेकडे गेला होता. त्यावेळी महिला व्यावसायिकाने जबरदस्तीने चप्पल कर्मचाऱ्याच्या तोंडात घातली आणि चप्पल तोंडात ठेवून माफी मागण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने महिलेकडे थकीत पगार मागितला होता. मात्र, तिने आणि अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. गुजरातच्या मोरबी शहरात एका व्यावसायिक महिलेसह तिच्या कर्मचा यांवर गुरुवारी एका दलित तरुणाला तिच्या फर्ममधील माजी कर्मचाऱ्याला तोंडात चप्पल ठेवून माफी मागण्यास भाग पाडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

    यासोबत महिला व्यावसायिकाने माजी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचेही समोर आलं आहे. मोरबी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.