संग्रहित फोटो
गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिसांचारच्या (Manipur Violence) आगीत होरपळत आहे. 3 मे 2023 ला सुरु झालेली ही हिंसा अद्यापही थांबण्याचं नाव नाही घेत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत अनेक लोकांनी जीव गमावला. आता पुन्हा समोर आलेल्या अपडेट नुसार, शुक्रवारी एका लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. हा अधिकारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी आला होता. शुक्रवारी सकाळी अज्ञात लोकांनी घरावर छापा टाकून लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण केलं. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी शोध मोहीम सुरू केली मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत किमान चार लष्करी अधिकाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे.
[read_also content=”तीन मैत्रिणी येणार भेटायला… महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ चित्रपटाची घोषणा! https://www.navarashtra.com/movies/on-occasion-of-international-womens-day-violet-flame-motion-pictures-announced-gulaabi-movie-nrps-513666.html”]
लष्कराचे कनिष्ठ आयुक्त अधिकारी (जेसीओ) कोन्सम खेडा सिंग हे मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सुटी घालवण्यासाठी तो त्याच्या घरी आला होता. शुक्रवारी पहाटे अज्ञात शस्त्रधारी व्यक्तींनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोन्सम खेडा सिंग यांना जबरदस्तीने सोबत नेलं. खेडा सिंगच्या अपहरणाची माहिती कुटुंबीयांनी सुरक्षा यंत्रणांना दिली. लष्करी अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस दल सक्रिय झाले मात्र त्यांचा अजुनही काहीही सुगावा लागलेला नाही आहे.
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून जातीय हिंसाचार सुरू आहे. केंद्रीय दले, सुरक्षा यंत्रणा, गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दिवस तळ ठोकून आणि त्यांच्या कनिष्ठ मंत्र्यांचे सतत प्रयत्न आणि आवाहन करूनही हिंसाचार थांबलेला नाही. आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ३ मे रोजी आदिवासी एकता रॅली काढण्यात आली. या दिवसापासून राज्यात हिंसाचार होत आहे. कुकी आणि मीतेई समाजाचे लोक समोरासमोर आहेत. यामुळे 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हजारो लोकांची घरे जाळली गेली आहेत. लोक बेघर झाले आहेत.






