Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahemdabad Plane Crash : भारतीयांवर दु:खाचा डोंगर; अहमदाबाद विमान अपघातातील १०० मृतदेह बाहेर काढले, आकडा वाढण्याची शक्यता

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मृतांचा आकडा समोर आला आहे. आतापर्यंत १०० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. अद्याप बरेच प्रवासी विमानाखाली अडकले असून एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 12, 2025 | 07:09 PM
भारतीयांवर दु:खाचा डोंगर; अहमदाबाद विमान अपघातातील १०० मृतदेह बाहेर काढले, आकडा वाढण्याची शक्यता

भारतीयांवर दु:खाचा डोंगर; अहमदाबाद विमान अपघातातील १०० मृतदेह बाहेर काढले, आकडा वाढण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मृतांचा आकडा समोर आला आहे. आतापर्यंत १०० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. अद्याप बरेच प्रवासी विमानाखाली अडकले असून एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विमानात मोठा स्फोट झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Ahmedabad Plane Crash : नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक; मुरलीधर मोहोळ यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडन गॅटविक विमानतळावर जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं. त्यात दोन पायलट आणि १० केबिन क्रू सदस्यांसह २४२ प्रवासी होते. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते.

The tragedy in Ahmedabad has stunned and saddened us. It is heartbreaking beyond words. In this sad hour, my thoughts are with everyone affected by it. Have been in touch with Ministers and authorities who are working to assist those affected. — Narendra Modi (@narendramodi) June 12, 2025

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहे. विमानाला उड्डाणासाठी परवानगी मिळाल्यानंतर सुमारे नऊ मिनिटांनी हा अपघात झाला. घटनास्थळी प्रचंड धुरामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर

एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अहमदाबाद-लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय १७१ चा आज अपघात झाला. सध्या, आम्ही तपशील तपासत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स शेअर करू. अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने १८०० ५६९१ ४४४ हा प्रवाशांसाठी हॉटलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.

The Ahmedabad Air India crash is heartbreaking. The pain and anxiety the families of the passengers and crew must be feeling is unimaginable. My thoughts are with each one of them in this incredibly difficult moment. Urgent rescue and relief efforts by the administration are… — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 12, 2025

‘प्रत्येक सेकंद, प्रत्येक जीव महत्त्वाचा’;  राहुल गांधी

अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा अपघात अत्यंत वेदनादायक आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ज्या वेदना होत असतील आणि चिंता वाटत असेल ती अकल्पनीय आहेत. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या प्रत्येकासोबत आहेत. प्रशासनाकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांही सर्व ती मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

Web Title: At least 91 killed in air india plane crash in ahmedabad latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Ahemdabad
  • air india
  • Plane Accident

संबंधित बातम्या

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी
1

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

विमानाची सावली जमिनीवर पडते का? पडते तर दिसत का नाही? जाणून घ्या
2

विमानाची सावली जमिनीवर पडते का? पडते तर दिसत का नाही? जाणून घ्या

नवी मुंबई International Airport वरून व्यावसायिक उड्डाणे होणार; Air India ने जाहीर केली ‘ही’ योजना
3

नवी मुंबई International Airport वरून व्यावसायिक उड्डाणे होणार; Air India ने जाहीर केली ‘ही’ योजना

Air India Express: विमान अपहरणाचा कट? कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ प्रवाशांना अटक, ‘हे’ आहे धक्कादायक कारण
4

Air India Express: विमान अपहरणाचा कट? कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ प्रवाशांना अटक, ‘हे’ आहे धक्कादायक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.