Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram mandir Donation Scam: क्लीनचीट नंतर चंपत राय यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ram mandir Donation Scam: राम मंदिर ट्रस्टच्या वतीनेही चंपत राय यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने त्यांना प्राथमिक स्तरावर दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता संपूर्ण लक्ष एसआयटीच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 08, 2026 | 12:45 PM
Ayodhya Ram Mandir, Champat Rai, Anil Mishra, SIT Investigation

Ayodhya Ram Mandir, Champat Rai, Anil Mishra, SIT Investigation

Follow Us
Follow Us:
  • चंपत राय यांची एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली
  • एसआयटीला दिलेल्या त्यांच्या लेखी जबाबाचा एक भाग लीक
  • राम मंदिर ट्रस्टच्या वतीनेही चंपत राय यांच्या बाजूने भूमिका
 

Ram  Mandir Docantion Scam: राम मंदिर दान चोरी प्रकरणी ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यांवर गंभीर आरोप झाले. या आरोपांप्रकरणी राय आणि मिश्रा यांनी राजीनामेदेखील दिले. त्यांच्या राजीनाम्यांनंतर अयोध्येतील वातावरण शांत होईल असे वाटत होते. परिस्थिती थोडी शांत झाली असतानाच, चंपत राय यांच्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापले.

एसआयटीचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, चंपत राय यांची एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, जी आजपर्यंतची त्यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया मानली जात आहे. या पोस्टमध्ये रामभक्तांना उद्देशून लिहिलेले एक पत्र होते. पत्रात, त्यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. तसेच, या आरोपांवर लवकरच पद्धतशीरपणे उत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक प्रचारक म्हणून आपली ४१ वर्षांची कारकीर्द आणि १९९१ पासून अयोध्या राम मंदिराशी असलेला आपला संबंधदेखील नमूद केला.

Ladki Bahin Yojana : राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी महत्त्वाची अपडेट; हफ्त्याचे पैसे वाढणार?

चंपत राय यांच्या एक्स-पोस्टनंतर लगेचच त्यांच्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली. एसआयटीला दिलेल्या त्यांच्या लेखी जबाबाचा एक भाग लीक झाला आहे. या लीक झालेल्या दस्तऐवजात, चंपत राय यांनी दानपेट्यांमधील पैसे मोजून ते बँकेत जमा करण्याचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

 

राम मंदिर ट्रस्टमधील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. चंपत राय यांनी बँकेसोबत झालेल्या सामंजस्य करारावर (MoU) आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करत, त्या प्रक्रियेत आपण सहभागी नव्हतो, असा दावा केला आहे. मतमोजणी प्रक्रियेत कथित दान चोरी किंवा सुरक्षेतील त्रुटींबाबतही आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात देणगीतील कथित अनियमिततेची जबाबदारी अप्रत्यक्षपणे अनिल मिश्रा यांनाच जबाबदार धरल्याचीचर्चा आहे. कारण संबंधित सामंजस्य करारावर अनिल मिश्रा यांची स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालातही अनिल मिश्रा यांना नोटीस बजावून चौकशीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही

लक्षणीय बाब म्हणजे, राम मंदिर ट्रस्टच्या वतीनेही चंपत राय यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने त्यांना प्राथमिक स्तरावर दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता संपूर्ण लक्ष एसआयटीच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

ट्रस्टच्या बैठकीपूर्वी हाय-व्होल्टेज घडामोडी

एसआयटी अहवालाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या बैठकीपूर्वी अनेक घडामोडी घडल्या आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास सुरुवातीला बैठकीबाबत नाराज असल्याची चर्चा होत. पण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते बैठकीला उपस्थित राहिले. याशिवाय ट्रस्टबाहेरील काही सदस्यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात आली होती.

बैठकीपूर्वी महंत नृत्य गोपाल दास यांनी पत्रक जारी करून दान चोरी प्रकरणाबाबत दुःख व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोषींवर योग्य कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title: Ayodhya ram mandir donation theft champat rai first official reaction x post letter to ram bhakt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • ayodhya
  • ram mandir
  • SIT investigation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.