Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Mandir Donation Scam: ‘चंपत राय यांचा हेतू निर्विवाद, पण…’; गोविंद देव गिरी यांचे मोठे विधान

चोरीची माहिती झाल्यानंतर कोणतीही ट्रस्टकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. ट्रस्ट या संदर्भात गोंधळून गेले होते त्यामुळे तक्रार करण्यास उशीर झाला. ते असंमज्यातून हा उशीर झाला.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 07, 2026 | 04:45 PM
Ram Mandir Donation Theft Govind Giri, Champat Rai Clean Chit Temple Row

Ram Mandir Donation Theft Govind Giri, Champat Rai Clean Chit Temple Row

Follow Us
Follow Us:
  • चंपत राय यांना ४-५ जूनलाच झाली होती चोरीची माहिती
  • असमंजसातून उशीर झाला, कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही
  • चंपत राय यांचा खासगी ड्रायव्हरच या सर्व चोरीमागचा सुत्रधार
Ram Mandir Donation Scam: अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरातून राम भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या दान चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान नवनवीन खुलासे आणि विधाने वेगाने समोर येत आहेत. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीनंतर, गोविंद देव गिरी यांनी चोरीसंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, ट्रस्टचा अंतर्गत विश्वास आहे की चंपत राय यांचा या प्रकरणात कोणत्याही प्रकारे सहभाग नाही आणि त्यांचे हेतू निर्विवाद आहेत. असं गिरी यांनी म्हटंल आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलं आहे गोविंद गिरी यांनी?

मंदिरातील दान चोरीचे प्रकरणाची माहिती कधी झाली. यात चंपत राय आणि अनिल मिश्रा यात किती दोषी आहेत। अखिलेश यादव यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची माहिती मिळाली की त्यापूर्वीच याची माहिती मिळाली होती. असा सवाल विचारला असता गोविंद गिरी म्हणाले की, याची माहिती चंपत राय यांना ४-५ जूनलाच याची माहिती मिळाली होती. पण चंपत राय यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवरच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार काही लहान नाही, वैयक्तिक पातळीवर ही समस्या सोडवली जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी समोर येऊन एसआयटी चौकशीच मागणी केली.

Delhi high Court on CJP: केंद्र सरकारला मोठा धक्का! ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पूर्ववत करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

चंपत राय यांना चोरीची पहिल्यांदा माहिती झाल्यानंतर ते तक्रार करायला गेले का, चोरीची माहिती मिळाल्यानंतर ट्रस्टकडून कारवाई करण्यात आली का, या प्रश्नावर बोलताना गिरी म्हणाले की, चोरीची माहिती झाल्यानंतर कोणतीही ट्रस्टकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. ट्रस्ट या संदर्भात गोंधळून गेले होते त्यामुळे तक्रार करण्यास उशीर झाला. ते असंमज्यातून हा उशीर झाला.

या असमंज्यातून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला का, असा कोणताही प्रयत्न चंपत राय करू शकत नाही. त्यांनी चांगल्या भावनेतून राय यांनी निर्विवाद हेतूने त्यांनी दयेच्या भावनेतून त्यांनी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला असावा. त्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली असावी, असे गोविंद गिरी यांनी नमुद केले.

राम मंदिरातील दान चोरीमध्ये कोणाचा हात असावा, हा विश्वासघात केला असावा ? चंपत राय यांचा खासगी ड्रायव्हरच या सर्व चोरीमागचा सुत्रधार होता, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. अशा व्यक्तीला आपल्या सोबत ठेवून राय यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राची लॉटरी? ३ खाती राज्याच्या वाट्याला

सगळ्या ट्रस्टमध्ये चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचेच वर्चस्व होते, मग त्यांना या चोरीची माहिती लवकर का मिळाली नाही?
चंपत राय आणि माझा गेल्या ३० वर्षांपासून ओळखतो. त्यामुळ ते अशी चोरी करतील असे वाटत नाही. अनेकदा ते त्यांना मिळालेल्या सुचनाही दुर्लक्ष करत होते. आपणच सर्व कामे सांभाळू शकतो. असे त्यांना वाटत होते. हा त्यांचा स्वभाव दोष असू शकतो, पण हा त्यांच्या चारित्र्याचा दोष नाही.

एसआयटीच्या अहवालानुसार, चोरीच्या कारवाया पाहता मंदिराच्या पूर्ण सिस्टिममध्येच दोष आहे. आता काही मोठा बदल करणार का. यावर बोलताना गिरी म्हणाले की, एसआयटीचा अहवाल आल्यावर आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ,

मंदिर चोरीच्या प्रकरणात ट्रस्ट देशवासियांची माफी मागणार का, आम्ही लज्जित आहोत, दु:खी आहोत. यासाठी आम्ही राम लल्लांची आणि राम भक्तांची माफी मागतो, पण आम्ही विनाकारण या प्रकरणाचा गोंधळ घालत आहेत, त्यांची माफी मागणार नाही.

Web Title: Ayodhya ram mandir donation theft trust treasurer govind dev giri interview champat rai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Akhilesh yadav
  • ayodhya
  • ram mandir
  • SIT investigation

संबंधित बातम्या

Mumbai : ‘रामाच्या नावावर भ्रष्टाचार?’ अयोध्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये शिवसैनिकांचा एल्गार
1

Mumbai : ‘रामाच्या नावावर भ्रष्टाचार?’ अयोध्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये शिवसैनिकांचा एल्गार

राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठा निर्णय; महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, तर गोपाल रावांना बैठकीबाहेरच रोखले
2

राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठा निर्णय; महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, तर गोपाल रावांना बैठकीबाहेरच रोखले

Ram Mandir Donation Scam: राम मंदिरात दान चोरीचा एक विशिष्ट पॅटर्न; काँग्रेसचा खळबळजनक आरोप
3

Ram Mandir Donation Scam: राम मंदिरात दान चोरीचा एक विशिष्ट पॅटर्न; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

Ram Mandir Recruitment: राम मंदिरात ‘काउंटिंग स्टाफ’ची भरती कशी होते? जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया एका क्लिकवर..
4

Ram Mandir Recruitment: राम मंदिरात ‘काउंटिंग स्टाफ’ची भरती कशी होते? जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.