‘आम्ही दिलगीर आहोत’; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर बाबा रामदेव यांनी सुप्रीम कोर्टात माहितली माफी

रामदेव आणि बाळकृष्ण दोघेही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सुनावणी सुरू झाली तेव्हा बाबा रामदेव यांच्या वकिलांनी सांगितले की, अशा जाहिरातीबद्दल आम्ही माफी मागतो. तुमच्या आदेशावरून बाबा रामदेव स्वतः कोर्टात आले आहेत

  गेल्या काही दिवसापासून बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनांच्या जाहीरातीवरुन (patanjali ayurved misleading advertisement case) वाद सुरू आहे. या जाहीराती दिशाभूल करणाऱ्या असल्याता सातत्याने आरोप होतोय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आता बाब रामदेव यांनी नमती भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी सुरू झाली यावेळी स्वत  योगगुरू रामदेव आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण हजर होते. सुनावणी दरम्यान,  बाबा रामदेव यांच्या वकिलांनी सांगितले की, अशा जाहिरातीबद्दल आम्ही माफी मागतो. तुमच्या आदेशावरून योगगुरू रामदेव स्वतः कोर्टात आले आहेत. पतंजली आयुर्वेदाच्या वकिलांनी सांगितले की, बाबा रामदेव स्वत: न्यायालयात आहेत. तो माफी मागत आहे आणि तुम्ही त्याची माफी रेकॉर्डवर ठेवू शकता.

  बाब रामदेव यांच म्हणणं काय

  बाबा रामदेव यांचे वकील म्हणाले, ‘आम्ही या न्यायालयापासून पळून जात नाही. मी हे काही परिच्छेद वाचू शकतो का? मी हात जोडून म्हणू शकतो का की ते गृहस्थ स्वतः कोर्टात हजर आहेत आणि कोर्ट त्यांचा माफीनामा नोंदवू शकते. सुनावणीदरम्यान पतंजलीच्या वकिलाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत सांगितले की, आमच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. म्हणूनच अशी जाहिरात निघाली. यावर न्यायमूर्ती अमानुल्ला आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, तुम्हाला याची माहिती नव्हती यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

  नोव्हेंबर 2023 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या जाहिराती मागे घेण्याचे आदेश दिले होते. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला  होता.  पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातीवर 1 कोटी रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

  न्यायाधीशांनी केले बाबा रामदेव यांचं कौतुक

  यावेळी न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, बाबा रामदेव यांनी योगाच्या बाबतीत खूप चांगले काम केले आहे. पण ॲलोपॅथीच्या औषधांबाबत असे दावे करणे योग्य नाही. आयएमएच्या वकिलाने सांगितले की, त्यांनी त्याची जाहिरात करावी, पण त्यात ॲलोपॅथी वैद्यकीय व्यवस्थेवर विनाकारण टीका करू नये. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हिमा कोहली यांनीही केंद्र सरकारला फटकारले. केंद्र सरकारने या प्रकरणी डोळे झाकून का ठेवले याचे आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले.