9 सेकंदात पत्त्यासारखी इमारत कोसळली, कुठे घडली घटना? थरारक दृश्य आली समोर (फोटो सौजन्य-X)
कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (22 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा एक सात मजली बांधकाम सुरू असलेली इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली.या दूर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.
या दूर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपात्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने रात्रभर बचावकार्य केले. आतापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या 13 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
Bengaluru, Karnataka: CCTV footage shows an under-construction building that has collapsed, where a rescue operation is underway pic.twitter.com/2Xzan5goq3
— IANS (@ians_india) October 22, 2024
इमारत कोसळल्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले – आम्ही निसर्गाला रोखू शकत नाही. नुकतेच दुबई आणि दिल्लीत काय घडले ते तुम्ही सर्वांनी पाहिले असेलच. ते थांबवता येत नाही. लोकांना वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. त्याच वेळी विरोधी पक्ष जेडीएस आणि भाजपने लक्ष्य केले आणि म्हटले – काँग्रेसने बेंगळुरूची दयनीय अवस्था केली आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी बेंगळुरूमधील एका बांधकामाधीन इमारत कोसळल्याप्रकरणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर टीका केली आणि म्हणाले – हे अत्यंत दुर्दैवी आहे की कर्नाटकच्या भ्रष्ट सरकारला शहरात बेकायदेशीर इमारत बांधली जात आहे याची जाणीव नव्हती. भ्रष्टाचारात बुडालेल्या काँग्रेस पक्षाच्या कर्नाटक सरकारने सिलिकॉन व्हॅलीची बदनामी केली आहे. सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि खरगे यांच्या कर्नाटक सरकारचे लक्ष सामान्य माणसांची काळजी घेण्यावर नसून गरिबांच्या जमिनी लुटण्यावर आहे, हे दुर्दैव आहे.
Karnataka, Bangalore: An under-construction building in the Babusapalya area has collapsed. Three workers have been rescued. According to the police, there is a possibility that 10 to 12 more workers may be trapped inside pic.twitter.com/PQvs2FxjVl
— IANS (@ians_india) October 22, 2024
तसेच भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी पुढे म्हणाले – बंगळुरूने आता जेवढे उदासीन दुशासन पाहिले आहे तसे कधीच पाहिले नव्हते. यात निष्पाप लोकांचा बळी गेला. हा नुसता अपघात नसून हत्येसारखा आहे आणि त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. कर्नाटक काँग्रेस सरकारने उत्तर द्यावे की जर त्यांना गरिबांची एवढी काळजी असेल तर शहराच्या मध्यभागी बेकायदा बांधकाम झाले, त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला हे कसे शक्य आहे. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले.
बेंगळुरूसह कर्नाटकातील अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. येलहंका आणि उत्तर बेंगळुरूच्या आसपासच्या अनेक भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बोटीच्या मदतीने लोकांना वाचवले जात आहे. दाना चक्रीवादळाचा प्रभाव कर्नाटकातही दिसून येत असल्याचे मानले जात आहे. अंदमान समुद्रातून निर्माण झालेले चक्रीवादळ ‘दाना’ बंगालच्या उपसागराच्या दिशेने वेगाने सरकत आहे. 25 ऑक्टोबर रोजी हे चक्रीवादळ पुरीच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.