बंगळुरु मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी (फोटो- istockphoto)
बंगळूर मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी
आलेल्या ईमेलमुळे अधिकारी चक्रावले
पत्नीला त्रास देत असल्याने दिली धमकी
बंगळूरमध्ये एका व्यक्तीने मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली आहे. एका व्यक्तिने बंगळूर मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडला एक ई-मेल लिहून ही धमकी दिली आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्ली येथे झालेल्या स्फोटामुळे सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान असा ईमेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्याने ईमेलमध्ये लिहिलेला मजकूर वाचून मेट्रो अधिकारी देखील चक्रावले आहेत.
एका व्यक्तीने थेट बंगळुरू मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी दिल्याचे एकच खळबळ उडाली. मात्र धमकी देण्यामागचे कारण वाचून अधिकारी देखील आश्चर्यचकित झाले आहेत. माझ्या माजी पत्नीस त्रास देऊ नका नाहीतर मेट्रो स्टेशन उडवून दिली जाईल अशी धमकी दिली गेली आहे.
तुमचे मेट्रो कर्मचारी ड्यूटी संपल्यावर माझ्या माजी पत्नीस त्रास देत आहेत ही मला समजले तर, लक्षात ठेवा. तुमच्या एका मेट्रो स्टेशनमध्ये स्फोट केला जाईल. आशा स्वरूपाचा ईमेल प्राप्त झाल्याने बंगळुरू मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये एकच खळबळ उडाली. धमकी देण्यामागचे कारण वाचून अधिकारी देखील चक्रावले आहेत.
एका व्यक्तीने मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास सुरू केला आहे. दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे या धमकीचा गंभीरपणे तपास सुरू करण्यात आला आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
हमासच्या मॉड्यूलनुसार ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्याचा कट होता, अशी खळबळजनक माहिती दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याने चौकशी दरम्यान दिली आहे. यामुळे तपास यंत्रणा हादरून गेल्या आहेत. दानिश हा ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ आहे. ड्रोनवर कॅमेरा आणि बॅटरी असलेला एक बॉम्ब बसवण्याची तयारी सुरू होती, परंतु त्याला मूर्त रूप देण्यापूर्वीच हा कट उधळला गेला.
हमासच्या मॉड्यूलनुसार ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्याचा कट होता, अशी खळबळजनक माहिती दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याने चौकशी दरम्यान दिली आहे. यामुळे तपास यंत्रणा हादरून गेल्या आहेत. दानिश हा ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ आहे. ड्रोनवर कॅमेरा आणि बॅटरी असलेला एक बॉम्ब बसवण्याची तयारी सुरू होती, परंतु त्याला मूर्त रूप देण्यापूर्वीच हा कट उधळला गेला.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करणान्या एनआयएला मोठे यश मिळाले आहे. एनआयएने उमरचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला अटक केली आहे. दानिशला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली, दानिश हा जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडचा रहिवासी आहे आणि त्याने दहशतवादी उमर उन नबीसह हल्ला करण्याचा कट रचला होता. एनआयएचे पथक जसीर बिलाल वाणीसह दिल्लीत दाखल झाले आहे. त्याला मंगळवारी सकाळी पटियाला हाऊस येथील विशेष एन्नआयए न्यायालयात हजर केले जाईल.






