(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. प्राजक्ता माळी छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ता (Prajakta Mali ) तिच्या अभिनयासोबत नवनवीन फॅशन सेन्सनं चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या तिचा आणखी एका म्हाळसा लूकनं चाहत्यांना भूरळ घालत आहे. या तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हाळसा लूकमध्ये दिसत आहे. या लूकची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.
‘प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज’ दागिन्यांच्या कलेक्शनच्या निमित्ताने पारंपरिक म्हाळसा लूक सादर केला आहे. या लूकमध्ये तिने काळ्या रंगाची साडी, गळ्यात दागिने, हातात बांगड्या,नाकात मोठी नथ, कानात सिल्व्हर फुले, केसांचा अंबाडा आणि बाजूबंद यांसह संपूर्ण पारंपरिक मेकअप केला आहे. प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या लूकचे फोटो-व्हिडिओ शेअर केले असून, तिचा हा पारंपरिक मराठी साज चाहत्यांमध्ये खूप पसंतीस उतरला आहे. तिच्या प्राजक्तराज ब्रँडमुळे मराठी दागिन्यांच्या परंपरेला आधुनिक फॅशनसह जतन करण्याचा प्रयत्न केला जातो.
हे फोटो व्हिडिओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले, गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य.. हॅशटॅग म्हाळसा असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तिच्या या फोटो व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. काही चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे,’क्रश’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे, ‘रूप सुंदरी’, तिसऱ्या चाहत्याने लिहिले, ”सुंदरी सुंदरी” अश्या अनेक कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या असून या लूकची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. सध्या तिच्या म्हाळसा लूकमुळे चर्चेत आली आहे.






