राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी भजनलाल शर्मा विराजमान; राजस्थानला मिळाले दोन उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंकडून नावाची घोषणा

    राजस्थान : राजस्थान विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजप बहुमताचे सरकार स्थापन करणार हे निश्चित झाले होते. परंतु, मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली होती. त्याची प्रतीक्षा आज संपली आहे. भाजप केंद्रातून आलेल्या प्रमुख निरीक्षकांकडून या नावाची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर प्रेमचंद बैरवा आणि दीया कुमारी यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी घोषणा केली आहे.