वर्ध्यात आज शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद ठेवत सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिक्षकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, शिक्षक अभियोग्यता परीक्षा धोरणात बदल करावा, संच मान्यता धोरणाचा फेरविचार करावा तसेच शिक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे.