ओवेसीमुळे इंडिया अलायन्सचे आठ जागांवर नुकसान; MIMचा पाच जागांवर विजय
Bihar Assembly Election 2025: निवडणुकीनंतर लहान मुलांसारखे रडू नका. आम्ही भाजपा आणि काँग्रेसशिवाय कोणाशीही युती करण्यास तयार आहोत. हा सल्ला एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजद नेते तेजस्वी यादव यांना दिला होता. ओवेसी राजदसोबत युती करू इच्छित होते
आणि सीमांचलमध्ये सहा जागांची मागणी करीत होते, परंतु तेजस्वी यांनी नकार दिला. ओवेसींनी २८ जागांवर उमेदवार उभे केले आणि अमौर, कोच्चाधामन, बहादुरगंज, जोकीहान आणि बैसी जिंकले. २०२० मध् एआयएमआयएमने त्याच जाग जिंकल्या होत्या, परंतु अमौरमधून जिंकलेले अख्तरुल इमान वगळता सम चारही आमदार राजदमध्ये सहभाग झाले. आता, एआयएमआयएमन केवळ तिच्या पाच जागा परत जिंकल्या नाहीत तर आठ जागांवर महाआघाडीचे थेट नुकसान केले.
Bihar Election 2025: ‘काल एका मुलीचा अपमान…’; अवघ्या २४ तासात रोहिणी आचार्य यांच्या दुसऱ्या पोस्टने
हैदराबाद, बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या प्रचंड विजयानंतर राजकीय विधाने तीव्र झाले आहेत, महाआघाडीशी संबंधित सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासारखे नेते त्यांच्या पराभवासाठी ईव्हीएम आणि एसआयआरला जबाबदार घरत असताना, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यानी त्यांना इशारा दिला आहे. ओवैसीच्या पक्षाने बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या, ते म्हणाले, एआयएमआयएमला मतदान केल्याबद्दल मी विहारख्या जनतेचे आभार मानू इच्छितो. त्या पाच जागा, जिंकणान्या सर्व उमेदवारांचे आणि पक्षाच्या सदस्यांचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल मी आभार आणि अभिनंदन करू इच्छितो. आम्ही बिहारच्या जनतेचा जनादेश स्वीकारतो. मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेही आभार मानू इच्छितो. आम्ही सीमाचलच्या कल्याणासाठी काम करू. त्यांनी अखिलेश यादव यांच्यावरही हल्ला चढवला.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडी बहुमत मिळवून सरकार स्थापनेच्या तयारीत असली, तरी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) अनपेक्षित हालचालींनी प्रमुख राजकीय पक्षांना आश्चर्यचकित केले आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाशी बसपाची वाढती जवळीक नवीन राजकीय समीकरणांची चिन्हे दाखवत आहे. बसपाने बिहारमध्ये स्वबळावर लढत दिली असली, तरी एआयएमआयएम नेत्यांकडून बसपाला मतदानाचे केलेले आवाहन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. बसपा नेते अनिल पटेल आणि विजयी उमेदवार पिंटू यादव यांच्या पत्रकार परिषदेत एआयएमआयएमचा पक्षध्वज दिसल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. पिंटू यादव यांच्या विजयी मिरवणुकीतही एआयएमआयएमचा ध्वज झळकला.
राज्यातील अनेक मतदारसंघांत एआयएमआयएमच्या प्रदेशाध्याक्षांनी जिथे त्यांचा उमेदवार नाही, तिथे बसपाला मतदान करण्याचे खुले आवाहन केले होते. बिहारमध्ये एआयएमआयएमची चंद्रशेखर आझाद यांच्या आजाद समाज पक्ष आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्या लोक दलित पक्षाशी युती होती.






