रोहिणी आचार्य यांची २४ तासात दुसरी पोस्ट तेजस्वी यादवांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप
Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने,
रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत बिहारच्या राजकारणात नवी खळबळ उडवून दिली आहे. “काल एका मुलीचा, एका बहिणीचा, एका विवाहित महिलेचा, एका आईचा अपमान करण्यात आला, शिवीगाळ करण्यात आली आणि तिला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही आणि म्हणूनच मला अपमान सहन करावा लागला.”अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. याशिवाय, “काल एका मुलीला तिच्या रडणाऱ्या आईवडिलांना आणि बहिणींना सोडण्यास भाग पाडण्यात आले. मला माझे माहेरघर सोडण्यास भाग पाडण्यात आले. मी अनाथ बनवले गेले. पण तुम्ही कधीही माझ्या मार्गाने जाऊ नका; रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणालाच न मिळो.” अशी खंतही रोहिणी आचार्य यांनी व्यक्त केली.
कल एक बेटी, एक बहन , एक शादीशुदा महिला , एक माँ को जलील किया गया , गंदी गालियाँ दी गयीं , मारने के लिए चप्पल उठाया गया , मैंने अपने आत्मसम्मान से समझौता नहीं किया, सच का समर्पण नहीं किया , सिर्फ और सिर्फ इस वजह से मुझे बेइज्जती झेलनी पडी ..
कल एक बेटी मजबूरी में अपने रोते हुए… — Rohini Acharya (@RohiniAcharya2) November 16, 2025
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर केलेल्या भावनिक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. “मला सांगण्यात आले की माझ्या वडिलांना घाणेरडी किडनी मिळाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त केली.
रोहिणी यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये धक्कादायक खुलासा करताना म्हटले, “काल माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मला घाणेरडी म्हटले गेले आणि माझ्या वडिलांना घाणेरडी किडनी मिळाली, असे सांगण्यात आले. कोट्यवधी रुपये घेऊन तिकिटे मिळवण्यात आली आणि शेवटी घाणेरडी किडनी दिली गेली. लग्न झालेल्या सर्व मुली आणि बहिणींना मी सांगू इच्छिते की, जर तुमच्या आईवडिलांच्या घरात मुलगा किंवा भाऊ असेल, तर देवासमान वडिलांना वाचवण्यासाठी स्वतःची किडनी देऊ नका. तुमच्या भावाला किंवा त्या घरातील मुलाला त्याची किडनी देण्यास सांगा.”
भावनिक आवेशात रोहिणी म्हणाल्या, “मी माझ्या मुलांची, कुटुंबाची, सासू-सासऱ्यांची काळजी न घेता मोठे पाप केले. माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी मी किडनी दान केली. यासाठी मी पती किंवा सासरकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. आता मात्र माझ्या या त्यागालाच ‘घाणेरडे’ म्हटले जात आहे. अशी चूक कोणत्याही मुलीने करू नये. रोहिणीसारखी मुलगी कोणालाच होऊ नये, असे वाटते.” रोहिणी आचार्यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा धक्कादायक आरोपांची मालिका उघड केली आहे. अगदी एक दिवसापूर्वीच केलेल्या पोस्टमध्ये रोहिणी यांनी त्यांच्या भाऊ आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर तसेच त्यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.
रोहिणी यांनी दावा केला होता की तेजस्वी यादव, त्यांचे विश्वासू सहकारी संजय यादव आणि रमीज यांनी तिला कुटुंबातून बाहेर काढले. बिहार विधानसभा निवडणुकीतील आरजेडीच्या पराभवानंतर पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्याने तिचा अपमान करण्यात आल्याचेही तिने सांगितले.
Haryana Crime: गुरुग्राम हादरलं! लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून तरुणाने बॉसची निर्घृण हत्या, कारण काय?
“संजय यादव आणि रमीज यांचा उल्लेख करताच मला घराबाहेर काढले. माझ्यावर शिवीगाळ झाली आणि मारहाणही करण्यात आली,” असे एएनआयशी बोलताना रोहिणी आचार्य यांनी सांगितले. तसेच “आता आपले कोणतेही कुटुंब उरलेले नाही” आणि त्यासाठी तेजस्वी यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची मागणी केल्यामुळेच आपल्यावर अशी वेळ आली, असा दावाही यावेळी रोहिणी आचार्य यांनी केला.






