Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar CM : ‘मोदींच्या मार्गावर बिहारचा विकास’; मुख्यमंत्रीपद स्वीकारताच सम्राट चौधरींचे पहिले वक्तव्य

बिहारचे नवे मुख्यमंत्रीच्या शपथविधीनंतर लगेचच सम्राट चौधरी यांनी पाटणा येथील लोक भवनात पदभार स्वीकारला. यावेळी बाहेर 'बुलडोझर बाबा जिंदाबाद'च्या घोषणा ऐकू येत होत्या

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 05:26 PM
Bihar new CM Samrat Chaudhary praised BJP and Modi in his first speech political news

Bihar new CM Samrat Chaudhary praised BJP and Modi in his first speech political news

Follow Us
Follow Us:

Bihar CM : बिहार : बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) एक मोठे स्थित्यंतर घडून आले आहे. नितीश कुमार यांचे पर्व संपले असून बिहारमध्ये भाजप राज सुरु झाले आहे. पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा नेता मुख्यमंत्री झाले आहे. भाजप (BJP) नेते सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला असून विकासाची हमी दिली आहे. आपण तात्काळ कामाला सुरुवात करणार असल्याचे आणि राज्यात ‘मोदी-नितीश मॉडेल’ कायम राहील, असे स्पष्ट मत नवनियुक्त मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी व्यक्त केले.

नितीश कुमार राज्यसभेत गेल्यानंतर बिहारमधील सत्ता आता थेट भाजपच्या नेतृत्वाखाली आली आहे. शपथविधीनंतर लगेचच सम्राट चौधरी यांनी पाटणा येथील लोक भवनात पदभार स्वीकारला. यावेळी बाहेर ‘बुलडोझर बाबा जिंदाबाद’च्या घोषणा ऐकू येत होत्या, परंतु त्यांनी स्पष्ट केले की बिहार आपल्या स्वतःच्या अद्वितीय विकास धोरणावरच पुढे वाटचाल करेल. तसेच राज्यात आतापर्यंत राबवले गेलेले विकास आणि सुशासनाचे धोरणच पुढे चालू ठेवले जाईल, असे देखील मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : राघव चड्ढांचा BJP ने घेतला बदला? नवनियुक्त AAP राज्यसभा उपनेते अशोक मित्तल ED च्या रडारवर

सम्राट चौधरी यांनी यापूर्वी नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. आता, नव्या व्यवस्थेअंतर्गत विजय कुमार चौधरी आणि विजेंद्र कुमार यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, हा बदल म्हणजे जुन्या धोरणांना नव्या नेतृत्वाची जोड देणारा बिहारच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

हे देखील वाचा : RSS चा बॅकग्राऊंड नाही, BJP मधून सुरुवातही नाही; तरी ८ वर्षांत सम्राट चौधरी कसे ठरले प्रभावी नेता?

जितन राम मांझी यांचे कौतुक

यावेळी केंद्रीय मंत्री जितन राम मांझी म्हणाले की, नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांपासून जे शासन मॉडेल दिले आहे, ते पुढे नेण्याची जबाबदारी आता सम्राट चौधरी यांच्यावर आहे. काही कमतरता असल्यास, नवीन सरकार त्या दूर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भावूक झालेल्या मांझी यांनी असेही सांगितले की, त्यांच्या राजकीय प्रवासात नितीश कुमार यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर भाजप नेते दिलीप जयस्वाल यांनीही नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आणि हा बिहारसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, सम्राट चौधरी नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला ‘विकसित बिहार’च्या दिशेने नेतील.

 

Web Title: Bihar new cm samrat chaudhary praised bjp and modi in his first speech political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Bihar News
  • Nitish Kumar
  • political news

संबंधित बातम्या

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर
1

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
2

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
3

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
4

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.