नवी दिल्ली – आगामी लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या धरतीवर अनेक पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीलास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता भाजपाने (BJP) राष्टीय पातळीवर खांदे पालट करत भाकरी फिरवली आहे. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. यात जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात दोन माजी मुख्यमंत्र्यांचा तर राज्यातील तीन नेत्यांचा समावेश आहे. या घोषणेमुळं राज्यातील तीन नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. (bjp national office bearers announced vijaya rahatkar pankaja munde vinod tawde also in national executive complete list)
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने निम्नलिखित केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की है- pic.twitter.com/0aaArxHF30 — BJP (@BJP4India) July 29, 2023
महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर जबाबदारी
दरम्यान, लोकसभेच्या धरतीवर या भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर ( vijaya rahatkar pankaja munde vinod tawde) या तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






