(Photo - X)
राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर एकच खळबळ उडाली. यावरून महायुतीत वाद सुरु असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटानेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अर्थमंत्री पदाची मागणी केली आहे. त्यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘राष्ट्रवादी अजित पवार गटाला भिकारी संबोधल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी आज (सोमवार, 26 ऑकटोबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अर्थमंत्री पदाची मागणी केल्याच्या मुद्दयावर त्यांनी सडकून टीका केली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अर्थखात्याच्या मागणीवरून अजित पवार गटाला सुनावलं. अर्थमंत्रीपद हा काही फार मोठा विषय नाही, असं सांगतानाच अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
‘अजित पवार हे अनुभवी आणि सक्षम नेते होते. त्यांचा एक वेगळा रुबाब होता, तुम्हाला मात्र पदासाठी ‘भिकाऱ्यासारखं दारात उभं राहावं लागतं, स्वाभिमान नावाची काही गोष्ट ठेवा’ अशा शब्दांत टोला लगावला.
राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. भाजपचे नेते शब्द पाळत नाहीत आणि राजकीय सोयीसाठी जवळ घेऊन नंतर दगलबाजी करतात, असा आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्याही मनात भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी होती आणि ते सरकारमधून बाहेर पडण्याच्या विचारात होते, असा दावा राऊतांनी केला.
त्यामुळे पदांसाठी सतत मागण्या करण्यापेक्षा स्वाभिमान जपावा, असा सल्लाही त्यांनी अजित पवार गटाला दिला. अर्थात, ही संजय राऊत यांची राजकीय भूमिका असून त्यांच्या आरोपांवर संबंधित पक्षांची बाजूही महत्त्वाची आहे.
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरूनही राऊतांनी भाष्य केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या 500 कोटींच्या संदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठ्या आर्थिक आकड्यांवरून खोचक टिप्पणी केली. काही लोकांसाठी हजारो कोटींची रक्कम किरकोळ वाटते, तर सामान्य माणसासाठी काही हजार रुपयेही मोठी बाब असते, असा आशय त्यांनी व्यक्त केला.
एकूणच, अर्थमंत्रीपदाच्या मागणीवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ खात्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. अजित पवार गटाचा स्वाभिमान, भाजपसोबतची सत्तेतील समीकरणं आणि महायुतीतील अंतर्गत राजकारण यावरून पुढचे काही दिवस आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil: 500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण? जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले…
Ans: राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची मागणी केल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी टीका केली. पदासाठी मागणी करण्याऐवजी स्वाभिमान जपावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Ans: अजित पवार हे अनुभवी आणि सक्षम नेते होते, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं, असं राऊत म्हणाले.
Ans: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या 500 कोटींच्या संदर्भातील वक्तव्यावर राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली. काही लोकांसाठी हजारो कोटी किरकोळ वाटतात, तर सामान्य माणसासाठी काही हजार रुपयेही मोठी रक्कम असते, असा आशय त्यांनी व्यक्त केला.






