भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन नबीन बिहार आमदारकीचा राजीनामा दिला (फोटो - सोशल मीडिया)
Nitin Nabin Resignation : बिहार : बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) (BJP Politics) राष्ट्रीय अध्यक्ष आणि बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन नबीन यांनी सोमवारी विधानसभेचा राजीनामा दिला. नितीन नवीन यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली आहे. यामुळे त्यांनी राज्यातील राजकारणातून बाहेर पडत दिल्लीतील राजकारणामध्ये (Political News) सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. 20 वर्षांहून अधिक काळ बिहार राज्याच्या राजकारणामध्ये असणारे नितीन नबीन हे राजीनाम्यावेळी भावूक झाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितीन नबीन यांना नुकतीच राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. घटनात्मक नियमांनुसार त्यांनी विधानसभेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यसभेतील नवीन राजकीय भूमिका आणि जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी, नितीन नवीन यांनी बांकीपूरच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, गेल्या २० वर्षांपासून, त्यांचे वडील, ज्येष्ठ नेते दिवंगत नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी जोपासलेल्या या भागाला त्यांनी नेहमीच आपले कुटुंब मानले आहे.
वडिलांच्या निधनानंतर राजकारणात पदार्पण
भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी पुढे सांगितले की, “जानेवारी २००६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी एप्रिल २००६ मध्ये पाटणा पश्चिम पोटनिवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. बांकीपूरच्या जनतेने त्यांना सलग पाच वेळा आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले,”हा त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावनिक अनुभव होता.
हे देखील वाचा : Lashkar-e-Taibaचा ‘मास्टरमाईंड’ जेरबंद! दिल्ली हादरवण्याचा मोठा कट उधळला; लाल किल्ला होता निशाण्यावर
बिहार विधानसभेच्या कार्यपद्धतीच्या नियमांनुसार, राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहावर निवडून आलेल्या सदस्याला १४ दिवसांच्या आत विधानसभेचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवेश कुमार, उपेंद्र कुशवाह आणि रामनाथ ठाकूर यांच्यासह नितीन नवीन हे १६ मार्च रोजी राज्यसभेवर निवडून आले होते आणि हा १४ दिवसांचा कालावधी आज, ३० मार्च रोजी संपला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही राजीनामा
नितीन नबीन यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. नितीश कुमार यांनी शेवटची २००४ मध्ये नालंदा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि तेव्हापासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत.
हे देखील वाचा : केवळ वाळवंट नाही, तर बलिदान अन् रंगांचा उत्सव; वाळवंटातील वीरांच्या भूमीचा ‘असा’ आहे रंजक इतिहास
राजकीय विश्लेषकांच्या मते, या राजीनाम्यांचा बिहारच्या राजकीय दिशेवर आणि राज्यसभेच्या जागांच्या समीकरणावर परिणाम होईल. नितीन नवीन यांचा राज्यसभेतील प्रवेश आणि नितीश कुमार यांचा विधान परिषदेतील राजीनामा राज्याच्या राजकीय परिस्थितीत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.






