Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boeing Aircraft : ६००० दुर्घटना, ९००० प्रवाशांचा बळी; बोईंग विमानाच्या रक्तरंजित प्रवासाची इनसाईड स्टोरी, नक्की वाचा

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनकडे उड्डाण भरलेलं एअर इंडियाचं फ्लाइट AI-171 विमान टेकऑफनंतर काही मिनिटात कोसळलं.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 12, 2025 | 09:03 PM
६००० दुर्घटना, ९००० प्रवाशांचा बळी; बोईंग विमानाच्या रक्तरंजित प्रवासाची इनसाईड स्टोरी, नक्की वाचा

६००० दुर्घटना, ९००० प्रवाशांचा बळी; बोईंग विमानाच्या रक्तरंजित प्रवासाची इनसाईड स्टोरी, नक्की वाचा

Follow Us
Close
Follow Us:

आयुष्यात एकदातरी विमान प्रवास करावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ढगांच्या पलिकडून जगाला पाहण्याची अनुभूती देणारा प्रवास हवा हवासा वाटत असतो. हा प्रवास जसा सुखद अनुभव देणारा असतो तसाच थरार आणि काहीसा अभिमानास्पदही वाटत असतो. मात्र प्रत्येकाच्या स्वप्नातला हा प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे.  आज घडलेल्या अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनकडे उड्डाण भरलेलं एअर इंडियाचं फ्लाइट AI-171 विमान टेकऑफनंतर काही मिनिटात कोसळलं. विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे. मात्र स्वप्नातला प्रवास घडवणाऱ्या आणि एकेकाळी प्रगत तंत्रज्ञानाचं प्रतीक मानल्या गेलेल्या या कंपनीच्या विमानांनी गेल्या काही वर्षांत इतकी अपघातांची मालिका अनुभवली आहे की त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकीकडे आधुनिकतेचा आव आणणाऱ्या या विमानांनी हजारो प्रवाशांचा बळी घेतला आहे. दरम्यान बाईंगची विमाने कशासाठी ओळखली जातात? आणि या विमानांचा रक्तरजित प्रवास कधीपासून सुरू झाला, पाहूयात या रिपोर्टमधून…

Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर

बोईंग 787-8 ड्रीमलाइनर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज, दीर्घ पल्ल्याच्या आणि प्रवाशांना आरामदायक अनुभव देणारं विमान म्हणून प्रसिद्ध होते. मात्र प्रत्यक्ष नोंदी काही वेगळीचं सांगतात. याच वर्षाच्या सुरुवातीला “N819AN” क्रमांकाच्या ड्रीमलाइनरमध्ये केवळ २५ दिवसांतच हायड्रॉलिक लीकेज आणि फ्लॅप फेलियरसारख्या गंभीर तांत्रिक दोष असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती.

बोईंगच्या अपघातांचा भयानक इतिहास

अहमदाबाद विमान दुर्घटना पहिलेच प्रकरण नाही. 2024 मध्ये दक्षिण कोरियात बोईंग 737-800 क्रॅश होऊन सुमारे 180 लोकांचा मृत्यू झाला. हे विमान 737 मॅक्सचे आधुनिक रूप होते. त्याआधी 2018 आणि 2019 मध्ये लायन एअर फ्लाइट 610 आणि इथिओपियन एअरलाइन्स फ्लाइट 302 या दोन अपघातांना जगाला हादरवून सोडलं. या दोन घटनांमध्ये अनुक्रमे 189 आणि 157 लोकांनी प्राण गमावले. त्या अपघातांनंतर 737 मॅक्स हे मॉडेल जगभरात ग्राउंड करण्यात आले आणि कंपनीला जवळपास 30 अब्ज डॉलरचा फटका बसला. 2023 मध्येही 737 मॅक्स उड्डाणाच्या दरम्यान दरवाजाचा प्लग सुटण्याची घटना घडली होती.

बोईंगच्या अपघातांची मालिका

बोईंगचा पहिला अपघात

तारीख: 18 फेब्रुवारी 1936

विमान: Boeing 247

ठिकाण: Pittsburgh, USA

घटना: वीज आणि वादळामुळे विमान कोसळले.

मृत्यू: 9 जण ठार

बोईंगचे मोठे अपघात

1. 1956 – Boeing 377

इंजिन फेल्युअरमुळे पॅसिफिक महासागरात अपघात

50 हून अधिक मृत्यू

2. 1977 – Boeing 747, टेनेरिफ (स्पेन)

दोन 747 विमानांची रनवेवर टक्कर

583 मृत्यू – जगातील सर्वात मोठा विमान अपघात

3. 1985 – JAL 123 (Boeing 747SR), जपान

टेल स्ट्रक्चर फेल्युअरमुळे कोसळले

520 जण ठार – सर्वाधिक मृत्यू झालेला सिंगल विमान अपघात

4. 1996 – TWA फ्लाइट 800 (Boeing 747), USA

इंधन टाकीमध्ये स्फोट

230 जण ठार

5. 2001 – 9/11 हल्ले (Boeing 767 विमाने)

अमेरिकन एअरलाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्सची विमाने

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला

प्रत्येकी विमानात 150 प्रवासी मृत्युमुखी

6. 2010 – Boeing 737, मंगळूर (भारत)

रनवेवरून बाहेर गेल्यामुळे अपघात

158 मृत्यू

7. 2013 – Boeing 777 (Asiana फ्लाइट 214), सॅन फ्रान्सिस्को

चुकीच्या लँडिंगमुळे अपघात

3 जण ठार

8. 2018 – Boeing 737 MAX (Lion Air), इंडोनेशिया

MCAS सिस्टिम बिघाड

189 जण ठार

9. 2019 – Boeing 737 MAX (Ethiopian Airlines)

पुन्हा MCAS सिस्टिममुळे अपघात

157 जण ठार

6,000 हून अधिक घटना, 9,000 पेक्षा जास्त मृत्यू

सरकारी आकडेवारीनुसार, जगभरात बोईंगच्या विमानांशी संबंधित सुमारे 6,000 अपघात आणि तांत्रिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील 415 घटना प्राणघातक होत्या आणि एकूण मृतांचा आकडा 9,000 च्या वर गेला आहे. आत्ताही जगभरात सुमारे 4,000 पेक्षा अधिक Boeing 737-800 विमानं कार्यरत आहेत, विशेषतः आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत त्यांचा वापर अधिक आहे.

व्हिसलब्लोअरचा गंभीर इशारा

बोईंगचे माजी अभियंता आणि व्हिसलब्लोअर सॅम सालेहपौर यांनी न्यूयॉर्क टाइम्स व CNN ला दिलेल्या मुलाखतीत 777 आणि 787 मॉडेल्सच्या उत्पादनादरम्यान कंपनीने सुरक्षा नियमांवर डावलून शॉर्टकट्स घेतल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “हे विमान जसे-जसे जुने होतील, तसतशी त्यांच्यातील अपघातांची शक्यता वाढत जाईल.”

Ahmedabad Plane Crash : विमान अपघातानंतर कोणता पार्ट सर्वात आधी शोधला जातो? त्या पार्टला इतकं महत्त्व का? जाणून घ्या

जगभरात लाखो प्रवासी बोईंगच्या विमानांवर विश्वास ठेवून प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांनी या विश्वासाला हादरा दिला आहे. केवळ तांत्रिक उणीवा नव्हे तर व्यवस्थात्मक हलगर्जीपणाही असल्याचं तज्ज्ञांच मत आहे. या पार्श्वभूमीवर, विमान वाहतूक कंपन्यांनी आणि सरकारांनी सुरक्षेच्या मुद्द्यांवर अधिक कठोर धोरणं राबवणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Web Title: Boeing safety concerns after air india ahmedabad plane crash latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Ahemdabad
  • air india
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
1

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…
2

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….
3

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक
4

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.