विमान अपघातानंतर कोणता पार्ट सर्वात आधी शोधला जातो? त्या पार्टला इतकं महत्त्व का? जाणून घ्या
गुजरातमधील अहमदाबाद येथून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या मेघानी भागात कोसळलं. विमान अपघातानंतर आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. या विमान अपघातात किती जीवित आणि वित्तहानी झाली आहे, सध्या याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान विमान अपघात होताच, त्यानंतर लगेचच काही विशेष गोष्टीचा शोध घेतला जातो. ही विशेष गोष्ट काय आहे आणि त्याला इतकं महत्त्व का जाणून घेऊया…
Ahmedabad plane crash : 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिकांचा समावेश;12 क्रू मेंबर्सची नावे आली समोर
जेव्हा कुठेही कोणत्याही प्रकारचं विमान कोसळतं तेव्हा त्या विमान अपघाताचं प्रथम कारण शोधलं जातं. यासाठी संपूर्ण प्रोटोकॉलचे पालन केलं जातं. विमान अपघातानंतर लगेचच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचतात.
विमान अपघातानंतर, त्याचा ब्लॅक बॉक्स प्रथम शोधला जातो. ज्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असेही म्हणतात. हे एक प्रकारचं रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे. ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाण डेटा रेकॉर्ड केला जातो.
विमान अपघातानंतर, त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अतिशय महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. विमान अपघातानंतर, त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते. जे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम देखील करते. भारतात, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरोद्वारे या पथकांना पाठवले जाते. ज्यामध्ये अनेक वेळा विशेष बचाव पथके सहकार्य करतात.
जेव्हा विमान अपघातात संपूर्ण विमान खराबपणे नष्ट होतं. अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स कसा वाचतो. हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतो. तर ब्लॅक बॉक्स कोणत्याही भीषण अपगातानंतरही सुस्थितीत राहतो. कारण तो टायटॅनियमपासून बनलेला असतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी, तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जातो.
Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता
ब्लॅक बॉक्समध्ये एक विशेष प्रकारचा लोकेटर बीकन बसवला जातो. जो अपघातानंतर 30 दिवसांपर्यंत सिग्नल पाठवत राहतो. जर विमान जमिनीवर कोसळले असेल तर त्यानंतर विमान शोधून त्यातून ब्लॅक बॉक्स मिळवला जातो. पण विमान जरी पाण्यात किंवा समुद्रात पडलं तरीही या ब्लॅक बॉक्समधून सिग्नल मिळत असतात. त्यामुळे अपघाताचं मूळ कारण आणि लोकेशन शोधण्यात ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावत असतो.