Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BPSC Students Protest: पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी

BPSC Students Protest: बिहारची राजधानी पाटणा येथे BPSCच्या 70व्या परीक्षेतील कथित अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील विविध मुद्द्यांविरोधात 15 विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. गांधी मैदानातून निघालेल्या मोर्चातील आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 02:42 PM
पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी

पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • BPSC विद्यार्थ्यांचा पाटण्यात एल्गार
  • बॅरिकेड्स तोडत राजभवनाच्या दिशेने कूच
  • 70वी परीक्षा रद्द करण्याची मागणी
 

BPSC Students Protest: महिन्याभरापूर्वी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. खासगी क्षेत्रातील शिक्षणामुळे स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांसाठी पालक लाखो रुपये कोचिंग क्लासेसवर खर्च करत आहेत. तर आता बिहारची राजधानी पाटणा येथे स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततांविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी (25 ऑगस्ट 2026) 15 विद्यार्थी संघटनांनी गांधी मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने सहभागी झालेले विद्यार्थी हातात तिरंगा, भगतसिंग यांची छायाचित्रे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन रस्त्यावर उतरले.

बॅरिकेड्स तोडत पुढे जाण्याचा प्रयत्न

या आंदोलनादरम्यान गांधी मैदानातून निघालेल्या आंदोलकांनी पुढे जात प्रतिबंधित भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडल्याचेही समोर आले. परिस्थिती लक्षात घेऊन पाटण्यातील अनेक महत्त्वाच्या भागांत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश न करण्याचे आवाहन केले.

गव्हाची निर्यातबंदी हटवली; पीठ, रवा व इतर पदार्थांच्या निर्यातीलाही परवानगी

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

आंदोलकांनी BPSC आणि इतर भरती प्रक्रियांशी संबंधित अनेक मागण्या मांडल्या आहेत. संविदा कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये दिले जाणारे अतिरिक्त वेटेज पूर्णपणे रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी आणि संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष असावी, अशी त्यांची भूमिका आहे. याशिवाय BPSSC अध्यक्ष के. एस. द्विवेदी यांच्या संपत्तीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.

70व्या BPSC परीक्षेचा वाद काय?

आंदोलनाचा प्रमुख मुद्दा 70वी BPSC परीक्षा आहे. आंदोलक उमेदवारांच्या आरोपानुसार या परीक्षेत अनियमितता झाली असून कथित पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा आयोजित करण्याची मागणी केली आहे. परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे आणि उमेदवारांच्या शंकांचे निरसन करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.

TRE 4.0 मध्येही बदलाची मागणी

विद्यार्थ्यांच्या मागण्या केवळ 70व्या BPSC परीक्षेपुरत्या मर्यादित नाहीत. प्रस्तावित Teacher Recruitment Examination अर्थात TRE 4.0 च्या प्रक्रियेतही बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. TRE 4.0 परीक्षा सिंगल स्टेज पद्धतीने घेण्यात यावी तसेच निगेटिव्ह मार्किंगची पद्धत रद्द करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या बदलांमुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सोपी आणि उमेदवारांसाठी न्याय्य होईल, असा आंदोलकांचा दावा आहे.

प्रशासनाकडून विद्यार्थ्यांशी चर्चा

मोर्चादरम्यान आंदोलकांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुढे न जाण्याची सूचना केली. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी आणि मोर्चा मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. DSP कामाख्या नारायण सिंह यांनी वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. चर्चेनंतर विद्यार्थी मोर्चा मागे घेतील, अशी अपेक्षाही प्रशासनाने व्यक्त केली.

एकीकडे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे 70वी BPSC परीक्षा, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि TRE 4.0 मधील प्रस्तावित बदलांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

CJP Action : कॉक्रोच जनता पार्टीकडून देशातील शिक्षणमंत्र्यांना पत्र; 5 वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काय केले?

Web Title: Bpsc students protest patna demand cancellation 70th exam tre 4 recruitment reforms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Exam
  • Protest
  • Students

संबंधित बातम्या

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
1

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

MPSC Protest: ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…..’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक
2

MPSC Protest: ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…..’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
3

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी
4

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.