गोपालगंज : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सहाव्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. त्यातच आता बिहारमधील गोपालगंज मतदारसंघातील बसप उमेदवाराला (BSP Candidate) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
बसपचे उमेदवार सुजित राम (Sujit Ram) यांनी इतर गावांमध्ये जाऊन सभेसाठी परवानगी मागितल्याच्या वेळी आणि ठिकाणी प्रचार करून रूट चार्टचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाला परवानगी नसल्याचा आरोपही राम यांच्यावर आहे. बसपच्या उमेदवाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुजित राम यांनी सभा व मिरवणूक काढण्याची परवानगी मागितली होती. प्रशासनाने त्यांना भगवानपूर ते धरमपारसा मार्गे चनावे, थावे गोपालगंज, भकुईया कोयनी, बरौली असा प्रवास करण्याची परवानगी दिली होती. रॅलीची वेळ दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत होती. मात्र, त्यांनी रूट चार्टचे उल्लंघन करून कुचायकोट विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या गावात जाऊन आपल्या गाडीतून प्रचाराला सुरुवात केली.






