महायुतीचा फॉर्म्यूला निश्चित rahul-narwekar-notice-to-urban-development-secretary-absent-officers मुंबईशी संबंधित महत्वाच्या विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुंबई महापालिका असेल किंवा नगरविकास सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याच्या मुददयावरून सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांनी आक्रमक होत तक्रार केली, संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दोन्ही बाजूंनी करण्यात आली. त्यावर याची दखल मी घेतली असून नगरविकास सचिवांना मी ताबडतोब नोटीस जारी करत असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुंबई महापालिका तसेच ठाणे व कल्याण महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर यामाध्यमातून चर्चा सुरू होती. मात्र या महत्वाच्या चर्चेच्या वेळी अधिकारी गॅलरीमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. कायद्यांची अमलबजावणी करणारेच गायब होतात भाजपच्या अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाने नियम २९३ चा प्रस्ताव मांडला आहे, पण महापालिका असेल वा नगरविकास असेल एकही संबंधित अधिकारी अधिकारी गॅलरीत उपस्थित नसल्याचे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या अधिवेशनात हा मुद्दा नवव्यांदा आला आहे. हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे. आपण कायदे करतो, अर्थसंकल्प मंजूर करतो. या अधिका-यांचे पगार आपण मंजूर करती पण अधिकारी उपस्थितच नसतात. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही नाना पटोले म्हणाले, या अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. चेंबूरला एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. मान्सूनपूर्व तयारीचे पैसे खर्च करूनही त्या बालकाचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, सरकारचा वचकच प्रशासनावर उरलेला नाही. हा केवळ सभागृहाचा नाही तर राज्यातील १४ कोटी जनतेचा अपमान हे अधिकारी करत आहेत. जयंत पाटील यांनी या अधिका-यांना आता सभागृहाची किमत राहिलेली नाही. राज्य त्याचेच आहे, असे त्यांना वाटते, जे गैरहजर असतील त्यांना किमान तीन दिवस निलंबित करा अशी मागणी केली. तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी यावेळी सभागृह सुरू असताना आयुक्त किवा संबंधित अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. या आधी दोन वेळा लेखी खुलासा मागविला आहे. संबंधित अधिका-याकडून लेखी खुलासा मागवत आहोत. Rahul Narwekar, Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion, Absent Officers Assembly, Rule 293 Motion, Sudhir Mungantiwar, Atul Bhatkhalkar
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील तीनही घटक पक्ष ३-१-१ फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत अद्याप सहमती झालेली नाही.
संभाव्य फॉर्म्युल्यानुसार, संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला, अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला, तर नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत अद्याप रस्सीखेच सुरू आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दावेदारी सुरू आहे. शिंदे गटातील उदय सामंत यांचे निकटवर्तीय सानप आणि’ आरोग्यदूत’ मंगेश चिवटे इच्छुक आहेत. जागावाटपावर अद्याप सहमती नसल्याने हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
23 ऑक्टोबरला मतदान
विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
या ५ जागांवर निवडणूक
औरंगाबाद पदवीधर : सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), माजी आमदार
पुणे पदवीधर : अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), माजी आमदार
नागपूर पदवीधर : अभिजीत वंजारी, काँग्रेस, माजी आमदार
अमरावती शिक्षक : किरण सरनाईक, शिवसेना (शिंदे गट), माजी आमदार
पुणे शिक्षक : जयंत आसगावकर, काँग्रेस, माजी आमदार
निवडणूक कार्यक्रम अधिसूचना जारी : २९ सप्टेंबर
नामांकनाची अंतिम तारीख : ०६ ऑक्टोबर
नामांकनपत्रांची छाननी : ०७ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर
मतमोजणी व निकाल
: २३ ऑक्टोबर
: २७ ऑक्टोबर






