Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lucknow Bus Accident: लखनऊमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित होऊन बस उलटली, ५ प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी

एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 11, 2025 | 10:22 PM
Lucknow Bus Accident: लखनऊमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित होऊन बस उलटली, ५ प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

Lucknow Bus Accident: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या काकोरी परिसरात गुरुवारी (आज) एक मोठा रस्ते अपघात झाला. गोलाकुआं गावाजवळ कैसरबाग डेपोची रोडवेज बस हरदोईहून लखनऊच्या दिशेने जात असताना अचानक अनियंत्रित होऊन एका खोल दरीत उलटली. एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसच्या खाली दबलेल्या प्रवाशांना पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

थाना काकोरी क्षेत्र में भीषण सड़क हादसा होने की सूचना, कई लोग घाययल,
सड़क हादसे में पलटी रोडवेज बस, टिकैतगंज पुल के पास हुआ हादसा,@Uppolice @lkopolice @lucknowtraffic pic.twitter.com/9LvGdYAdPg

— Akram~Journalist~(Lko Up) (@akram117080) September 11, 2025

नेमकी घटना कशी घडली?

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगात होती. काकोरीच्या गोलाकुआं गावाजवळ बसची एका टँकरसोबत जोरदार धडक झाली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सुरुवातीला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांना धडकली आणि त्यानंतर २० फूट खोल दरीत जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच काकोरी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.

स्थानिक लोकांनीही बचावकार्यात मोठी मदत केली. क्रेनच्या मदतीने बस सरळ करून तिच्या खाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. उपचार सुरू असताना आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

हे देखील वाचा: गोळ्यांच्या आवाजांनी थरारले छत्तीसगड; 1 कोटींचे बक्षीस असलेला कमांडर ठार; तर 10 नक्षलवाद्यांना थेट…

मुख्यमंत्री योगींनी घेतली घटनेची दखल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले असून, ते लवकर बरे व्हावेत अशीही कामना केली आहे.

ही बस हरदोईहून लखनऊच्या कैसरबाग बस स्टँडकडे येत होती. बसमध्ये सुमारे ५४ प्रवासी होते. काकोरीच्या टिकैतगंजजवळ टँकरसोबत झालेल्या धडकेनंतर बस २० फूट खोल दरीत उलटली. या अपघातामुळे बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.

 

Web Title: Bus overturned in lucknow fatal accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 10:17 PM

Topics:  

  • Accident Death
  • Bus Accident
  • Lucknow
  • Nation News
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Sonia Gandhi: नागरिकत्व प्रकरणात सोनिया गांधींना मोठा दिलासा, न्यायालयाने याचिका फेटाळली
1

Sonia Gandhi: नागरिकत्व प्रकरणात सोनिया गांधींना मोठा दिलासा, न्यायालयाने याचिका फेटाळली

हेल्मेट न घातल्याने कार मालकाला दंड! ‘या’ अजब चालानची सर्वत्र चर्चा
2

हेल्मेट न घातल्याने कार मालकाला दंड! ‘या’ अजब चालानची सर्वत्र चर्चा

भाजप आमदार Hardik Patel यांच्या अडचणी वाढल्या, अहमदाबाद ग्रामीण न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
3

भाजप आमदार Hardik Patel यांच्या अडचणी वाढल्या, अहमदाबाद ग्रामीण न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

अरे बापरे! ऑनलाइन गेमने केली करणी; आता कर्ज फेडण्यासाठी तरुणाने विकायला काढली किडनी
4

अरे बापरे! ऑनलाइन गेमने केली करणी; आता कर्ज फेडण्यासाठी तरुणाने विकायला काढली किडनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.