छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान (फोटो- सोशल मीडिया)
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना कंठस्नान
गरियाबंदमध्ये टॉप कमांडर ठार
एक कोटी रुपयांचे होते बक्षीस
Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाने छत्तीसगडच्या गरियाबंद येथे 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुरक्षा दलाने छत्तीसगडच्या गरियाबंद येथे ही कारवाई केली आहे. गरियाबंद येथे सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन राबवले आहे. या भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. या कारवाईत 1 कोटींचे बक्षीस असणारा टॉप कमांडर देखील ठार झाला आहे.
सुरक्षा दलाने गरियाबंद येथे हे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या पूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. सुरक्षा दले व नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यामध्ये एक कोटींचे बक्षीस असलेला टॉप कमांडर ठार झाला आहे. या भागात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने नक्षलवादाविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. मोडेम बालकृष्ण या टॉप कमांडरवर एक कोटींचे बक्षीस होते. अखेर त्याला ठार मारण्यात यश आले आहे. या कारवाईत छत्तीसगड पोलिस, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांचा समावेश होता. गरियाबंद हा कायमच नक्षलवाद्यांचा गड राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे.
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. अबुझहमदमध्ये सुरक्षा दलांनी वरिष्ठ नक्षलवादी कमांडरना घेरले आहे. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांमधून जिल्हा राखीव रक्षकांनी (DRG) ही कारवाई केली. या कारवाईत आतापर्यंत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगली भागामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली.
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टालू टेकड्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा दलांनी ‘ब्लॅक फॉरेस्ट’ या नावाने नक्षलविरोधी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 214 नक्षलवादी लपण्याची ठिकाणं आणि बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तर शोधमोहिमेदरम्यान एकूण 450 आयईडी, 818 बीजीएल शेल, 899 कोडेक्स, डेटोनेटर आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय जवळपास 12 हजार किलोग्रॅम अन्नसाठादेखील जप्त करण्यात आला आहे. नारायणपूर जिल्ह्यातील अबुझहमाड जंगलात सुरक्षा दलांनी २६ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले. आतापर्यंत २० माओवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.