फोटो सौजन्य: Social Media
पॅन कार्ड हे भारतीयांसाठी किती महत्वाचे आहे हे आपण सर्वेच जाणतो. एखादा तरुण 18 वर्षाचा झाला की त्याचे पालक त्यास पॅन कार्ड काढण्यास सांगतात. वेळोवेळी पॅन कार्डमध्ये अनेक बदल कार्नाय्त येतात. आता केंद्र सरकाने PAN 2.0 प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला आहे. या नवीन बदलानुसार आता पॅन कार्डमध्ये क्यूआर कोडची सुविधा मिळणार आहे. यामुळेच नक्कीच भारत डिजिटल इंडियाकडे आपले पाऊल टाकत आहे.
अशावेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत आहे की जसे की पॅन कार्ड काय आहे, ते कसे बनवले जाते, आता जुन्या कार्डचे काय होणार, नवीन पण कार्ड का बनत आहे, याच्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागणार का. चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
परमनंट अकाउंट नंबर (PAN) इनकम टॅक्स विभागाकडून जारी केले जाते. हे मुख्यतः आर्थिक कामासाठी वापरले जाते. जसे की इनकम टॅक्स भरणे, बँक खाते उघडणे किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे. पॅन कार्ड हा 10 अंकी क्रमांक असतो, ज्यामध्ये तुमच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व माहिती नोंदवली जाते. यात तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित संपूर्ण माहितीही असते.
जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळेल. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही आहे. ते तुमच्या पत्त्यावर डिलिव्हर केले जाईल. परंतु, जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर तुम्हाला डिजिटल किंवा फिजिकल पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.
नवीन पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड असणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव सुधारेल. डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन 2.0 प्रकल्प अधिक उपयुक्त बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यातही हे कार्ड महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यामुळेच सरकार पॅन आणि आधार लिंक करण्यावर खूप भर देत आहे.
यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट क्रमांक मिळेल. याद्वारे तुम्ही तुमच्या पॅन कार्डचे स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता.