भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष (Independence Day) पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारने ‘हर घर तिरंगा मोहीम’ही (Har Ghar Tiranga) सुरू केली आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहीमेमध्ये देशबांधवांनी घरोघरी तिरंगा फडकवावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी तिरंगा यात्रा, तिरंगा रॅलीही निघत आहेत. मात्र चंदीगडमध्ये (Chandigarh) वेगळ्या तिरंग्याची चर्चा आहे.(largest human chain forming tiranga)
Chandigarh registers name in Guinness World Record for largest human chain forming Tiranga
Read @ANI Story | https://t.co/Y7QWf96skj#Chandigarh #Tiranga #NationalFlag #GuinnessWorldRecord #HarGharTirangaCampaign #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/hPJ5AVNb5D
— ANI Digital (@ani_digital) August 13, 2022
आज चंदीगडमध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत तब्बल ७५०० विद्यार्थ्यांनी एकत्र उभे राहून मानवी ध्वज बनवला. चंदीगडमधील सेक्टर-१६ मधील क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी सकाळी १०.३० वाजता नागरिकांनी एकत्रित येऊन मानवी तिरंगा ध्वज साकारला आहे.
या खास कार्यक्रमात चंदिगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हवेत फडकणाऱ्या तिरंग्यासारखा आकार या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. यावेळी संपूर्ण स्टेडियम ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी दुमदुमले.