• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Raigad News Fulfill The Demands Otherwise Employees Teachers Hold Protest For Pending Demands

Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक व कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आज म्हणजेच 12 फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यात धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 12, 2026 | 03:38 PM
Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन
  • मागण्या पूर्ण करा अन्यथा..
अलिबाग : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक व कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आज म्हणजेच 12 फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यात धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. देशातील विविध कामगार-कर्मचारी संघटनांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शवत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच सर्व तालुक्यांतील तहसीलदार कार्यालयांबाहेर आंदोलन पार पडले.देशभरातील सुमारे पाच कोटी कामगार-कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविल्याचा दावा संघटनांनी केला असून, महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख कर्मचारी-शिक्षक व संघटित-असंघटित कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला. रायगडमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी, शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावून शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली.
या आहेत प्रमुख मागण्या

आंदोलनकर्त्यांनी चार कामगार संहिता रद्द करणे, पीएफआरडीए कायदा रद्द करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, आठवा वेतन आयोग तात्काळ लागू करणे, रिक्त पदे भरणे, सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे, महागाईवर नियंत्रण ठेवणे, खासगीकरण व कंत्राटीकरण थांबविणे, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करणे, टीईटी परीक्षा रद्द करणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधले.
माथाडी व असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करावा, मनरेगा कायद्यातील बदल मागे घ्यावेत, सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबवावे तसेच विभागांचे संकोचीकरण बंद करावे, अशा मागण्याही निवेदनातून मांडण्यात आल्या.

Karjat News : माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?

पेन्शन प्रश्न प्रलंबित
महाराष्ट्र शासनाने 1 मार्च 2024 पासून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली असली तरी त्यासंबंधीची कार्यपद्धती व नियम अद्याप जाहीर न झाल्याने 1 मार्च 2024 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ मिळालेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ पेन्शन योजनेचा लाभ द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.राज्यातील विविध विभागांत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून भरती प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने एका कर्मचाऱ्यावर अनेकांची जबाबदारी येत आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण वाढत असून सेवा गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.

निवेदन सादर
आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.कर्मचारी-शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, निमंत्रक प्रभाकर नाईक, सरचिटणीस संतोष पवार, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना जिल्हा तर्फे परशुराम म्हात्रे, दर्शना पाटील, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष संदीप नागे, सर्वहारा जन आंदोलनचे चंद्रकांत गायकवाड, सोपान सुतार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु

Web Title: Raigad news fulfill the demands otherwise employees teachers hold protest for pending demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Alibaug
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

महादेव- पार्वतीचा आशीर्वाद आणि सखीची साथ, विशाल- अक्षयाने बांधली प्रेमाची लग्नगाठ
1

महादेव- पार्वतीचा आशीर्वाद आणि सखीची साथ, विशाल- अक्षयाने बांधली प्रेमाची लग्नगाठ

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
2

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना
3

“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात
4

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Feb 12, 2026 | 05:44 PM
RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

Feb 12, 2026 | 05:42 PM
अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

Feb 12, 2026 | 05:38 PM
 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

Feb 12, 2026 | 05:36 PM
13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

Feb 12, 2026 | 05:32 PM
ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

Feb 12, 2026 | 05:28 PM
National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

Feb 12, 2026 | 05:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.