छठ पूजेचा UNESCO च्या यादीत होणार समावेश करणार असल्याची पीएम मोदींची 'मन की बात'च्या १२६ वा भागात घोषणा केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
PM Modi Mann Ki baat News : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत संवाद साधत असतात. आज (दि.28) ‘मन की बात’च्या १२६ वा भाग प्रदर्शित झाला. यावेळी पंतप्रधान मोदींनी शहीद भगतसिंग आणि ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाचे स्मरण केले. भगतसिंगांना प्रेरणास्त्रोत म्हणून वर्णन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की अमर शहीद भगतसिंग हे प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की निर्भयता ही भारताच्या स्वभावात खोलवर रुजलेली आहे. देशासाठी फाशी देण्यापूर्वी शहीद भगतसिंग यांनी ब्रिटिशांना एक पत्र लिहिले. त्यांनी म्हटले होते की तुम्ही मला आणि माझ्या साथीदारांना युद्धकैद्यांसारखे वागवावे अशी माझी इच्छा आहे, म्हणून आमचे जीवन फाशी देऊन नाही तर गोळ्या घालून घेतले पाहिजे, अशी शहीद भगतसिंग यांच्या आठवणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जागवल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोलकाताच्या दुर्गापूजेचा युनेस्कोच्या यादीत समावेश
सध्या नवरात्रौत्सव सुरु असून सर्वत्र देवीची आराधना केली जात आहे. संपूर्ण देशामध्ये विविध पद्धतीने देवीची पूजा केली जात असली तरी कलकत्तामधील दुर्गा पूजा ही विशेष असते. नवरात्रीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी आठवण काढत दुर्गापूजेचा UNESCO मध्ये समावेश झाला असल्याचे सांगितले. नवरात्रीच्या पवित्र उत्सवादरम्यान, पंतप्रधान मोदींनी बंगालच्या दुर्गापूजा मंडळांचा उल्लेख केला. ते म्हणाले की काही काळापूर्वी, भारत सरकारच्या अशाच प्रयत्नांमुळे, कोलकाताची दुर्गापूजा देखील युनेस्कोच्या यादीचा भाग बनली. जर आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अशी जागतिक मान्यता दिली तर जग त्यांच्याबद्दल जाणून घेईल, त्यांना समजून घेईल आणि त्यात सहभागी होण्यासाठी पुढे येईल.
छठपूजेचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ या महान सणाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “मला तुम्हाला हे कळवताना खूप आनंद होत आहे की भारत सरकार देखील छठ पूजेशी संबंधित एका मोठ्या प्रयत्नात गुंतले आहे. भारत सरकार छठ या महान सणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जेव्हा छठ पूजा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केली जाईल, तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना त्याची भव्यता आणि दिव्यता अनुभवता येईल.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
PM मोदींनी लता मंगेशकर यांचे केले स्मरण
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या संगीत योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले, “आज लता मंगेशकर यांची जयंती आहे. भारतीय संस्कृती आणि संगीतात रस असणारा कोणीही त्यांच्या गाण्यांनी प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्यांच्या गाण्यांमध्ये मानवी भावनांना उजाळा देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. त्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी लोकांना खूप प्रेरणा दिली. त्यांचा भारतीय संस्कृतीशीही खोल संबंध होता. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये भावना व्यक्त केल्या