(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
संपूर्ण देशभरात सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जात आहे. मंदिरांपासून ते मंडपांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी देवी दुर्गेची आराधना, पूजन आणि संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. सोशल मीडियावर देखील विविध ठिकाणचे दुर्गा पूजांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.या सगळ्यांत बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दोघीही दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा पूजेमध्ये अत्यंत भक्तिभावाने सहभागी झाल्या आहेत. दोन्ही अभिनेत्री पारंपारिक वेशभूषेत तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दुर्गा पुजेत मुखर्जी कुटुंब भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण काजोलचे लाडके काका, देब मुखर्जी, आता त्यांच्यात नसून पूजेच्या वेळी काजोल, राणी आणि त्यांच्या बहिणी तनिषा मुखर्जीला देब मुखर्जींच्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले. त्यांचा भावनिक क्षणांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन लेकरांचा गुदमरून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राणी आणि काजोल देवीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करताना दिसत आहेत. दोघींनी देवीच्या मूर्तीवर फुलांचा वर्षावदेखील केला. या पूजेदरम्यान राणीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर काजोलने सोनेरी रंगाची साडी नेसल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या साध्या लूकने सर्वांची मने जिंकली. तसेच, नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
दरम्यान, या दुर्गा पूजेत शरबानी मुखर्जी व सुमोना चक्रवर्तीदेखील दिसल्या. दोघी काजोलच्या बहिणी आहेत. राणी मुखर्जीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर, काजोल सध्या टू मच विथ काजोल व ट्विंकल या शोमध्ये दिसत आहे.