Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Parliament March LIVE: CJPचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

सोनम वांगचुक यांच्या  विनंतीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आलीआहे.  आज सकाळी सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडल्याचे बोलले जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 20, 2026 | 03:19 PM
CJP Parliament March LIVE:  CJPचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
Follow Us
Follow Us:

CJP Parliament March LIVE:  कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) संसद मार्चदरम्यान पोहचला असतानाच दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सीजेपीचा मोर्चा संसदेच्या दारात असतानाच अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याने वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

“दिल्ली पोलिसांनी आमचे सहकारी अभिजीत दीपक यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रशासन शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर अत्यंत निर्घृणपणे कारवाई करत असून त्यांना मारहाण केली जात आहे,” असा गंभीर आरोप कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केला आहे.

Mallikarjun Kharge: ‘विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, पण हे सरकार…’, राज्यसभेत पेपर लीक प्रकरणावर

 

या कारवाईनंतर आक्रमक झालेल्या सौरव दास यांनी देशातील विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांना तात्काळ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. “आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी खासदारांनी आता पुढे यायला हवे,” असे त्यांनी म्हटले आहे. संसद मार्च दरम्यान झालेल्या या धरपकडीमुळे जंतर-मंतर आणि संसद परिसर भागात कमालीचा तणाव वाढला आहे.

दरम्यान,  सोनम वांगचुक यांच्या  विनंतीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आलीआहे.  आज सकाळी सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं.

सीजेपीच्या आजच्या संसद मार्चच्या दरम्यान आज मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सीजेपीच्या आजच्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून विद्यार्थी जंतरमंतरवर दाखल होत आहेत.  आज सकाळच्या सुमारास विद्यार्थी संसदेकडे निघाले असता पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून विद्यार्थ्यांचे रस्ते अडवले होते. यामुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. यात काही विद्यार्थी जखमी झाले.

यानंतर विद्यार्थी आंदोलक दुपारच्या सुमारास  संसदेच्या आवाराजवळ पोहोचलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या कारवाईमुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून ‘सीजेपी’ने प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक संसदेच्या परिसरात दाखल होऊ लागले आहेत.  ससंदेच्या मुख्य प्रवेश द्वारावर पोलिस आणि सैनिकांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. दुसरीकडे जंतरमंतर विद्यार्थ्यांवर  लाठीचार् केल्याने काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना प्रथमोपचार कऱण्यासाठी देखील कोणतीही मदत पुरवली जात नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

 

Web Title: Cjp parliament march live cjp founder abhijit dipke detained by delhi police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Delhi Police
  • Student Protest

संबंधित बातम्या

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
1

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
2

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा
3

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.