Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Tribal Students Protest : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक घेतली. 12,500 पदांची भरती आणि अनुसूचित जमातीचा बिंदू क्रमांक 2 वर आणण्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 04:33 PM
मुंबई उच्च न्यायालयाचेही आंदोलनाची दखल; विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाचेही आंदोलनाची दखल; विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • 12,500 पदांची भरती तीन महिन्यांत करण्याचे आश्वासन
  • अनुसूचित जमातीचा बिंदू क्रमांक 2 वर आणण्यासाठी कार्यवाही
  • मुंबई उच्च न्यायालयाचेही आंदोलनाची दखल; विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश
पुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला (Pune Tribal Students Protest) आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आंदोलनाचा सतरावा दिवस असताना आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर काही मागण्यांवर तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांसाठी 12 हजार 500 अधिसंख्य किंवा रिक्त पदांवर तातडीने भरती करण्याचा प्रमुख मुद्दा आहे. या पदांच्या भरतीसाठी पुढील तीन महिन्यांत जाहिरात काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

अनुसूचित जमातीचा बिंदू क्रमांक 2 वर आणण्याची मागणी

विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीच्या बिंदूनामावलीतील बदलाचाही मुद्दा उपस्थित केला. 2017 मध्ये अनुसूचित जमातीसाठी बिंदू क्रमांक 2 होता. मात्र, 2024 मध्ये तो क्रमांक 5 करण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. हा बिंदू पूर्वीप्रमाणे क्रमांक 2 वर आणण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली डीबीटी पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे वसतिगृहातील प्रत्यक्ष भोजन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील सेंट्रल किचन व्यवस्था बंद करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी लेखी आश्वासन हातात मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाचीही आंदोलनाची दखल

दरम्यान, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

गरज भासल्यास आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. एकाही विद्यार्थ्याचा जीव जाता कामा नये, अशी भूमिका न्यायालयाने मांडली.

या संपूर्ण प्रकरणात आमदार सुनील भुसारा यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री तसेच आंदोलनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणाऱ्या राहुल गांधी आणि रोहित पवार यांचे आभार मानले. आता शासनाच्या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थी आंदोलन मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pune tribal students protest devendra fadnavis 12500 posts recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • pune news
  • Student Protest
  • Tribal Department

संबंधित बातम्या

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना
1

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार
2

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी? BPCL च्या प्रस्तावावर स्थायी समितीचे श्रीनाथ भिमाले म्हणाले…
3

पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी? BPCL च्या प्रस्तावावर स्थायी समितीचे श्रीनाथ भिमाले म्हणाले…

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.