Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Protest Day 34: जंतरमंतरवरील रात्रीच्या राड्यानंतर आता कशी आहे परिस्थिती? रात्री नेमकं काय घडलं?

आंदोलकांनी रात्रभर लाल सिग्नलवर गोंधळ घातला आणि पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचे अधिकारी रात्रभर बॅरिकेड्सवर तैनात असल्याचे दिसून आले. काही आंदोलकांनी आपले चेहरे झाकले होते, तर काहींनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. काहींनी स्पायडर-मॅनचे मुखवटे घातले होते,

  • By anuradha sagar
Updated On: Jul 23, 2026 | 10:48 AM
Abhijit Dipke, CJP Protest, Jantar Mantar, Delhi Police

Abhijit Dipke, CJP Protest, Jantar Mantar, Delhi Police

Follow Us
Follow Us:

CJP Night Clashes Jantar Mantar: पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात बुधवारी पुन्हा मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. जंतरमंतरवर रात्री साडेआठच्या सुमारास दिल्ली पोलिस आणि विद्यार्थ्यांध्ये चकमक झाली. या चकमकीत विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठा संघर्ष सुरू होता. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये घडलेल्या चकमकीमुळे जंतरमंतरवर पुन्हा दगडफेकीच्याही घटना घडल्या. यात काहीजण पुन्हा गंभीर जखमी झाले.

आंदोलक आणि पोलिसांमधील संघर्ष रात्री उशिरापर्यंत झालेल्या संघर्षानंतर आज सकाळपर्यंत परिस्थिती सामान्य झाल्याचे दिसत होते. अजूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. दिल्ली पोलीस ड्रोनच्या साहाय्याने आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. दिल्ली पोलीस आणि सरकारविरोधात घोषणाबाजीही केली जात आहे.

Delhi CJP Protest Live: जंतरमंतरवर राडा, इंटरनेट बंद, विद्यार्थी आक्रमक; CJPचा पोलिसांवर गंभीर आरोप

आंदोलकांनी आपले चेहरे झाकले होते

आंदोलकांनी रात्रभर लाल सिग्नलवर गोंधळ घातला आणि पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचे अधिकारी रात्रभर बॅरिकेड्सवर तैनात असल्याचे दिसून आले. काही आंदोलकांनी आपले चेहरे झाकले होते, तर काहींनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. काहींनी स्पायडर-मॅनचे मुखवटे घातले होते, तर काहींनी रुमाल बांधले होते. जंतर मंतरवरील आंदोलनाचा आज ३४ वा दिवस आहे. मात्र, गेल्या चार रात्रींपासून आंदोलनाची तीव्रता वाढली असून, जंतर मंतरवरील गर्दी सातत्याने वाढत आहे. सकाळीसुद्धा सीजेपीचे हजारो समर्थक उपस्थित होते.

भाजप बाहेरुन गुंड पाठवतोय- अभिजीत दिपकेंचा आरोप

या चकमकीनंतर सीजेपी अध्यक्ष अभिजीत दीपके म्हणाले की, आतापर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते, पण एका महिन्यानंतर बाहेरून गुंड पाठवण्यात आले आहेत, जे वातावरण बिघडवत आहेत. आंदोलनात मुद्दाम अडथळा आणण्यासाठी बाहेरून लोकांना पाठवले जात आहे. आम्ही महिनाभर इथे बसलो आहोत. महिनाभरात अशी कोणतीही घटना घडली नाही, पण आता आंदोलन वाढल्यामुळे भाजप बाहेरून गुंड पाठवून इथल्या विद्यार्थ्यांना चिथावणी देत ​​आहे. खुद्द भाजपच दगडफेक करत आहे. पोलीसांनीच इथे दगडांनी भरलेले ट्रक आणले आणि आता भाजपचे गुंड येऊन दगडफेक करत आहेत. त्यामुळे सीजेपीचे आंदोलन बदनाम करत आहेत.’ असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.

CJP Protest Updates: ‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन्…’, आंदोलनादरम्यान ‘सीजेपी’चे क्रेंद सरकारसमोर चार मोठ्या अटी; 

यापूर्वी, काल रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलकांची संख्या ३,००० ते ४,००० पर्यंत वाढली होती आणि रात्री उशिरापर्यंत सातत्याने जंतर मंतरवर येणाऱ्याचा ओघ वाढतच चालला होता. पण जंतरमंतर वर समाजकंटक जमले होते, काही आंदोलक जमावात सामील झाले, त्यांनी आधी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांवर दगडफेक केली. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

या संघर्षात दोन एसीपी, दोन इन्स्पेक्टर आणि एका कॉन्स्टेबलसह पाच पोलीस जखमी झाले. अनेक आंदोलकही जखमी झाले. नवी दिल्लीतील जंतर मंतर, टॉल्स्टॉय मार्ग आणि पार्लमेंट स्ट्रीट येथील एनडीएमसी इमारतीसमोर जमाव जमला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांनी सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याशी चर्चा केली, परंतु जमावाने ऐकले नाही.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि आरएएफ (RAF) यांच्यात अशाच प्रकारच्या चकमकी होत आहेत. काही समाजकंटक संध्याकाळी जमावात सामील होत असून, हे बाहेरील लोक गोंधळ निर्माण करून तणाव वाढवत आहेत.

डीएमआरसीने सकाळी ७:३० वाजल्यापासून राजीव चौक, सुप्रीम कोर्ट, मंडी हाऊस आणि आयटीओ यासह १६ रेल्वे स्थानके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली मेट्रोच्या एका पोस्टनुसार, लोक कल्याण मार्ग, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सेवा तीर्थ, जनपथ, सेंट्रल सेक्रेटरीएट, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

 

 

 

Web Title: Cjp protest day 34 what is the situation now following the late night commotion at jantar mantar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Cockroach Janata Party
  • Delhi Police

संबंधित बातम्या

Megha Dhade Oppose CJP: सीजेपीच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा तीव्र विरोध, आक्रमक विरोधी पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली..
1

Megha Dhade Oppose CJP: सीजेपीच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा तीव्र विरोध, आक्रमक विरोधी पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली..

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर मंतरवर रात्री पुन्हा राडा, नेमकं घडलं काय?
2

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर मंतरवर रात्री पुन्हा राडा, नेमकं घडलं काय?

Salman Khan: ‘ज्या विद्यार्थ्यांना दुखापत झालीये…’, विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…
3

Salman Khan: ‘ज्या विद्यार्थ्यांना दुखापत झालीये…’, विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

Delhi CJP Protest Live: जंतरमंतरवर राडा, इंटरनेट बंद, विद्यार्थी आक्रमक; CJPचा पोलिसांवर गंभीर आरोप
4

Delhi CJP Protest Live: जंतरमंतरवर राडा, इंटरनेट बंद, विद्यार्थी आक्रमक; CJPचा पोलिसांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.