File Photo : baba ramdev
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव हे पतंजली या त्यांच्या उत्पादनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. पण आता दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सोशल मीडियावरील दावा मागे घेण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये ‘कोरोनिल’ हा कोरोनाचा उपाय म्हणून प्रचार करण्यात आला होता. यासोबतच अॅलोपॅथीच्या परिणामाबाबत सांगितलेल्या गोष्टीही मागे घ्याव्या लागतील.
दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना हे काम करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे. न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठाने सांगितले की, प्रतिवादींना काही सामग्री आणि पोस्ट तीन दिवसांच्या आत काढून टाकण्यास सांगितले आहे, अन्यथा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना तसे करण्याचे निर्देश देण्यात येतील. न्यायमूर्ती भंभानी यांनी पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर २१ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.
मेडिकल असोसिएशनची याचिका
दिल्ली मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याचिकेत असे म्हटले आहे की, रामदेव बाबा यांच्या कंपनीने कोरोनिल किटबद्दल खोटे दावे केले आणि त्याला कोविड रोगाचा उपचार असल्याचे म्हटले. तर त्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा म्हणून परवाना देण्यात आला.