बाबा रामदेव यांनी सांगितले सोपे उपाय (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
बाबा रामदेव आपल्या इन्स्टाग्राम आणि अनेक कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाच्या प्राचीन पद्धती प्रत्येक घरात पोहोचवत आहेत. बाबा रामदेव केवळ त्यांची पतंजली उत्पादने विकत नाहीत तर शारीरिक आणि मानसिक समस्यांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक उपायांबद्दलदेखील सांगतात. ते त्यांच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, जिथे बाबा रामदेव उपाय सांगत असताना त्यांचे व्हिडिओ शेअर करत राहतात. यावेळी बाबा रामदेव यांनी वात, पित्त आणि कफ काढून टाकण्यासाठी रामबाण उपचार सांगितले आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयींमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात. यामुळे शरीरातील तीन प्रमुख दोषांचे म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडू लागते. जेव्हा त्यांचे संतुलन बिघडते तेव्हा शरीरात वेगवेगळे आजार सुरू होतात. तर बाबा रामदेवांकडून वात-पित्त आणि कफ दोषांचे संतुलन करण्यासाठी रामबाण उपचार जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात तीन प्रमुख दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. बाबा रामदेव यांच्या मते, शरीरातील दोषांचे संतुलन राखणे केवळ रोगांपासून संरक्षण करण्यासाठीच नाही तर दीर्घायुष्य आणि मानसिक शांतीसाठी देखील महत्त्वाचे आहे. यासाठी बाबा रामदेव यांनी काही नैसर्गिक पद्धती सुचवल्या आहेत, मुळात वात, पित्त आणि कफ हे ज्या शरीरातील भागातून होतात त्यावर काम करणे गरजेचे आहे, सुचवलेल्या पद्धती ज्या खालीलप्रमाणे आहेत.
पिंपळाच्या झाडीखाली बसल्याने फक्त मनच शांत होत नाही तर वात, पित्त आणि कफ यासरखे विकारही बरे होतात
बाबा रामदेव यांच्या मते, जर एखाद्याला मूत्रपिंडाचा त्रास असेल तर त्याच्यासाठी दुधीची भाजी खाणे फायदेशीर ठरू शकते. दुधीची भाजी किडनीचे कार्य सुधारण्यासाठी प्रभावी आहे. खरं तर, दुधीमध्ये व्हिटॅमिन सी ते व्हिटॅमिन बी 1 पर्यंत अनेक जीवनसत्त्वे आढळतात. याशिवाय, बार्लीच्या अर्तात सत्तूच्या पिठापासून बनवलेली चपाती किडनीच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे, कारण बार्लीत फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
बाबा रामदेव यांनी सांगितले की साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही अर्जुनच्या सालीसह दालचिनीचे सेवन करू शकता. असे केल्याने साखर नियंत्रित होईल. यासोबतच हृदय देखील निरोगी राहील. त्याच वेळी, कच्चे अन्न खाल्ल्याने साखरेची पातळी आणि हृदय निरोगी राहण्यासदेखील मदत होते.
बाबा रामदेव यांनी सायनस आणि दम्यासाठी पंतजिलच्या उत्पादनाबद्दलदेखील सांगितले. त्यांच्या मते, जर एखाद्याला सायनस आणि दम्याचा त्रास असेल तर तो अणुतेल वापरू शकतो. मात्र तुम्ही हे सर्व उपाय कऱण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
पित्ताची वाढ झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘या’ गंभीर समस्या, वेळीच लक्ष देऊन त्वचेच्या घ्या काळजी
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.