commercial lpg gas cylinder

दिवाळीनंतर व्यावसायिकांना केंद्र सरकारने दिलासा देत कमर्शिअल सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinder) किमतीत ५७.५० रुपयांची कपात केली आहे. दिवाळीपूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०१.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता तेल विपणन कंपन्यांनी नवे दर जाहीर केले.

    नवी दिल्ली : दिवाळीनंतर व्यावसायिकांना केंद्र सरकारने दिलासा देत कमर्शिअल सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinder) किमतीत ५७.५० रुपयांची कपात केली आहे. दिवाळीपूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०१.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता तेल विपणन कंपन्यांनी नवे दर जाहीर केले असून, प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

    केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल व रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक स्वयंपाकाचा गॅस वापरकर्त्यांना दिलासा मिळाला असेल. कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर ठेवल्या आहेत. या कंपन्यानी घेतलेल्या आढाव्यात घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही, घरगुती वापरासाठी १४.२ किलोचा सिलिंडर मुंबईत ९०२.५० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची किमत २०० रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली होती.

    असे आहेत कमर्शिअल सिलिंडरचे दर

    – दिल्ली – १७७५.५०, कोलकाता – १८८५.५०, मुंबई – १७२७, चेन्नई – १९४२ (किंमत रुपयांत).