Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सचिन पायलटच्या पदयात्रेदरम्यान काँग्रेसने बोलावली दिल्लीत बैठक, काँग्रेसच्या प्रभारी यांनी घेतला ‘हा’ निर्णय

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात तणाव वाढत आहे. सचिन पायलट यांनी गुरुवारी (11 मे) पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेत जनसंघर्ष पदयात्रेला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयानंतर शुक्रवारी (१२ मे) दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली.

  • By Aparna
Updated On: May 12, 2023 | 06:48 PM
sachin pilot and ashok gehlot

sachin pilot and ashok gehlot

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात तणाव वाढत आहे. सचिन पायलट यांनी गुरुवारी (11 मे) पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेत जनसंघर्ष पदयात्रेला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयानंतर शुक्रवारी (१२ मे) दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली.राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर रंधवा यांच्याशिवाय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासारा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव काझी निजामुद्दीन, वीरेंद्र राठोड आणि राज्याचे सहप्रभारी अमृता धवन या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर रंधावा म्हणाले की, ही पायलट यांची वैयक्तिक पदयात्रा आहे. ते म्हणाले, “आम्ही यात्रेवर लक्ष ठेवून आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातून दिल्लीत परतल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करू. आम्ही आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडू.

सचिन पायलटच्या पदयात्रेचा अर्थ
अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न म्हणून सचिन पायलटच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे. वसुंधरा राजे यांच्या सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात गेहलोत यांनी गेल्या चार वर्षांत कोणतीही कारवाई केली नसल्याचे पायलट सातत्याने सांगत आहेत.

आपल्या पाच दिवसांच्या यात्रेचे वर्णन ‘भ्रष्टाचारविरोधी जनसंघर्ष पदयात्रा’ असे करताना पायलट म्हणतात की, ‘आवाज उठवा आणि जनतेचा आवाज व्हा’ यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत पायलट आणि गेहलोत यांच्यातील खडाजंगीमुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अलिकडच्या काळात पायलट आणि गेहलोत यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. आमच्याविरोधात बंड करून आमदारांनी भाजपकडून पैसे घेतल्याचे गेहलोत एकीकडे सांगत आहेत. यावर उत्तर देताना पायलटने हा आरोप खोटा असल्याचे सांगितले होते.

Web Title: Congress called a meeting in delhi during sachin pilots padayatra the in charge of congress took this decision nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 06:48 PM

Topics:  

  • Ashok Gehlot
  • Congress
  • india
  • rajasthan
  • sachin pilot

संबंधित बातम्या

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
1

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक
2

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार
3

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.